Banana plantation 
ॲग्रो विशेष

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ५० हजार हेक्टरवर

Banana Cultivation : यंदा केळीलागवड खानदेशात वाढू शकते, अशी स्थिती सुरुवातीपासून होती.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मृग बहरातील उशिराची केळी लागवड आटोपली आहे. अर्ली केळीलागवड जून व जुलैमध्येच झाली आहे. यंदा केळीलागवड खानदेशात वाढू शकते, अशी स्थिती सुरुवातीपासून होती. यंदा मृग बहर केळीची लागवड ५० ते ५१ हजार हेक्टवर झाल्याचा अंदाज आहे

सर्वाधिक मृग बहर केळी पीक जळगावातील रावेरमध्ये असून, तेथे सुमारे २२ हजार हेक्टरवर मृग बहर केळी पीक आहे. केळीचे दर यंदा उन्हाळ्यात अस्थिर होते. जुलैमध्ये दर वधारले. केळीला चांगला पर्याय कृत्रिम जलसाठाधारकांकडे नाही. यामुळे केळी लागवड कायम आहे. यंदा ती वाढू शकते, असा अंदाज होता.

यंदा मार्च ते मेच्या मध्यापर्यंत दर्जेदार केळीला कमी उठाव होता. या काळात दर कमी होते. मृग बहर केळीचे उत्पादनही बऱ्यापैकी आले. जळगाव जिल्ह्यात मृग बहर केळीची काढणी मार्च अखेरीस सुरू झाली. तर कांदेबाग केळीची काढणी गणेशोत्सव, दसरा सणापासून सुरू होत असते. सध्या पिलबाग, कांदेबाग केळीची काढणी यावल, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव, जामनेर, नंदुरबारमधील अक्कलकुवा, शहादा भागात सुरू आहे.

या केळीला किमान २००० व कमाल २६०० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मिळाला आहे. मृग बहर केळीची लागवड मेमध्ये सुरू होते. अर्ली लागवड मेच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाते. तर नियमित लागवड जूनपासून सुरू होते. खानदेशात मृग बहर केळीखालील क्षेत्र अधिक असते. तर कांदेबाग केळीखालील क्षेत्र कमी असते. कांदेबाग केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर भागांत केली जाते.

तर मृग बहर केळीची लागवड जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागांत केली जाते. केळी लागवडीसाठी केळी रोपांचा उपयोग वाढला आहे. मजूरटंचाईचा फटका काही भागांत बसला आहे.

रोपांच्या किंवा उतिसंवर्धित केळी रोपांच्या लागवडीसाठी चांगले नियोजन करून घ्यावे लागते. यंदा खानदेशात मृग बहरातील केळीची एकूण लागवड ५० ते ५१ हजार हेक्टरवर झाल्याचा अंदाज आहे. अनेकांनी ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीलाही ही लागवड केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT