Banana Export Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export : केळीला विक्रमी ३१०० रुपये दर ; काश्मिरात पाठवणूक

Banana market Price : काश्मीर आणि दिल्ली येथील मोठ्या खरेदीदारांकडून २७५०, ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर निर्यातक्षम किंवा उत्तम दर्जाच्या केळीला मिळत आहे. परंतु यंदा काश्मीरमध्ये पाठवणुकीच्या केळीला विक्रमी ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर नुकताच मिळाला.

Team Agrowon

Jalgaon News : काश्मीरमध्ये पाठवणुकीच्या केळीला खानदेशात विक्रमी ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. केळीचा तुटवडा वाढला असून, मागणी अधिक आहे. विविध भागांत पाठवणुकीच्या केळीचे वेगवेगळे दर आहेत. त्यात सध्या कमी दर्जाच्या केळीला ८००, ९०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. तर दर्जेदार केळीला १९५०, २०५० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

काश्मीर आणि दिल्ली येथील मोठ्या खरेदीदारांकडून २७५०, ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर निर्यातक्षम किंवा उत्तम दर्जाच्या केळीला मिळत आहे. परंतु यंदा काश्मीरमध्ये पाठवणुकीच्या केळीला विक्रमी ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर नुकताच मिळाला. दिल्ली व काश्मीरमध्ये सध्या रोज पाच ते सात ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळी बॉक्समध्ये पॅकिंग करून पाठविली जात आहेत.

खानदेशात सध्या फक्त चोपडा, जळगाव, जामनेर, पाचोरा-भडगाव, धुळ्यातील शिरपूर या भागात केळीची आवक होत आहे. या भागात कांदेबाग केळीची (ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या बागा) लागवड अधिक केली जाते. इतरत्र कांदेबाग केळी लागवड नसते. मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लागवडीच्या केळी बागांमधून आवक सुरू आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा या भागात केळीची आवक अल्प किंवा कमी आहे. सध्या प्रतिदिन ६५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक खानदेशात होत आहे. केळीला उठाव अधिक आहे. उत्तर भारतात उत्तर प्रदेशात केळीची आवक घटली आहे. राज्यात सणासुदीमुळे केळीला उठाव आहे.

उत्तर भारतात सध्या आंध्र प्रदेश, गुजरात व मध्य प्रदेशातूनही केळीची पाठवणूक कमालीची घटली आहे. खानदेशातील केळीला तेथे मोठा उठाव आहे. परिणामी दरात चांगली वाढ या महिन्यात झाली आहे. या महिन्यात मागील आठवड्यात केळीचे किंवा काश्मीरमध्ये पाठवणुकीच्या केळीचे कमाल दर २७०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात मागील दोन तीन दिवसांत चांगली वाढ झाली आहे. चोपडा, जळगाव भागांत दर्जेदार केळीची आवक सुरू आहे. जामनेरात आवक रखडत सुरू आहे. पण तेथे पुढील आठवड्यात केळीची आवक वाढू शकते. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात पिलबाग किंवा खोडवा केळीतून आवक अद्याप सुरू झालेली नाही. केळीची मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती आहे.

आखातात केळी निर्यात बंद

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळीची आवक घटली असून, तेथेही सध्या ४० ते ५० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. मध्य प्रदेशातील काही खरेदीदार जळगाव जिल्ह्यातूनही केळीची खरेदी करीत आहेत. तेथेही किमान दर १०५० आणि कमाल दर ३००० रुपये प्रतिक्विंटल असा आहे. यातच केळीचा तुटवडा असल्याने मध्य प्रदेश व जळगाव जिल्ह्यातून आखातातील केळी निर्यात बंद झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT