Bamboo Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Farming : बांबू भविष्यामध्ये वाचविणारा पर्याय : पाशा पटेल

Bamboo Cultivation : भारताचे इंधनावरील अवलंबित्व कमी करून पुढील काही वर्षांत डिझेल व पेट्रोलला पर्याय दिला जाणार आहे.

मुकूंद पिंगळे

Patna News : भारताचे इंधनावरील अवलंबित्व कमी करून पुढील काही वर्षांत डिझेल व पेट्रोलला पर्याय दिला जाणार आहे. लवकरच बांबूपासून इथेनॉल आणि त्यातून बायोडिझेलची निर्मिती होणार आहे.

सर्वाधिक तापमान वाढ कोळशापासून होणाऱ्या वीज उत्पादन आणि पेट्रोल-डिझेलच्या प्रदूषणामुळे होत आहे. या दोन्ही बाबींवर बांबू हाच भविष्याला वाचविणारा पर्याय आहे, असे प्रतिपादन राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.

सहकार भारती संस्थेच्या शेतकरी उत्पादक कंपनी प्रकोष्ठ आयोजित पहिले एफपीओ राष्ट्रीय अधिवेशनामध्ये रविवारी (ता. २५) ‘पर्यावरण रक्षण व शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध संधी’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर शेतकरी उत्पादक कंपनी प्रकोष्ठचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. एम. मुरलीधरन उपस्थित होते.

पुढे बोलताना पटेल म्हणाले, की तापमान वाढ या गंभीर समस्येमुळे संपूर्ण जग होरपळत आहे. परिणामी, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जगाला गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येणारी पिढी वाचवायची असेल तर सर्वांनी पुढे येऊन सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

त्यासाठी वृक्ष लागवड, डिझेल पेट्रोल व प्लॅस्टिक वापर बंद करावा लागणार आहे. यासह पर्यावरण रक्षणासाठी ऑक्सिजन निर्मितीची गरज आहे. त्यामुळे कमी कालावधीत वाढ होणाऱ्या बांबू हा पर्याय आहे.

एक बांबूचे झाड ३२० किलो ऑक्सिजन तयार करतो. त्यामुळे बांबू लागवड काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात वीजनिर्मितीसाठी कोळशाला बांबूचाच पर्याय असणार आहे. फक्त पर्यावरण संवर्धनासाठी नव्हे तर शेतकऱ्यांना एक शाश्वत पीक म्हणूनही बांबू लागवडीचा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.

त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने बांबू लागवड तंत्र समजून घेतल्यास यातून अनेक संधी निर्माण होऊ शकतात. या पिकातून उत्पन्नाची हमी आहे. महाराष्ट्र शासनाने या बाबत लागवडीचे धोरण आणले आहे त्यातून बांबू लागवडीचा विस्तार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बांबूमुळे पर्यावरण समतोल, उत्पन्नवाढीस मदत

बांबूपासून जवळपास २ हजार वस्तू बनविता येणे शक्य आहे. टूथब्रश, कंगवा, चष्मा, बाटली, अनेक गृहोपयोगी व दैनंदिन वापराच्या वस्तू, आकर्षक फर्निचर, विविध वस्तूंसोबतच कापड निर्मितीही बांबूपासून होते. त्यामुळे मोठी मागणी आहे. बांबूच्या लागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी मोठी भरही घालणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT