Bamboo Farming : बांबू लागवड योजनेसाठी १६ हजारांचे उद्दिष्ट, प्रस्ताव केवळ १८५२ दाखल

Bamboo Cultivation : सध्या एक हजार ८५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव रोजगार हमी विभागाकडे दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक २६१ प्रस्ताव मारेगाव तालुक्यातील आहे.
Bamboo Farming
Bamboo FarmingAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : रोजगार हमी योजनेतून पहिल्यांदाच बांबू लागवड योजना राबविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात सोळा हजारांचे उद्दिष्ट आहे. सध्या एक हजार ८५२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव रोजगार हमी विभागाकडे दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक २६१ प्रस्ताव मारेगाव तालुक्यातील आहे. पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे.

पावसाळ्यात मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. परिणामी, मजुरांना रोजगारासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आता अमृत महोत्सव फळझाड, वृक्षलागवड, फुलपीक लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. रोजगार हमी योजनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे.

Bamboo Farming
Bamboo Cultivation : पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे

या वैयक्तिक लाभार्थ्यांना सलग शेत, शेताचे बांध तसेच पडीक जमिनीवरसुद्धा बांबूची लागवड करता येणार आहे. एक हेक्टरसाठी लाभार्थ्यांना एक हजार १११ बांबूचे रोप उपलब्ध करून दिले जाणार आहे. वृक्ष लागवडीपासून ते संवर्धनापर्यंत लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी सात लाख पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय एक हजार प्रमाणे सोळा हजार बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या योजनेत महात्मा गांधी रोजगार हमी योजना विभाग, वन, मृद व जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसीच्या अधिग्रहीत जमीन तसेच इतरही शासकीय जागेवर बांबू लागवड केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने शासकीय, पडीक, ई-क्लास, गायरान, गावठाण, धरण, प्रकल्पाच्या बाजूच्या जमिनीवर बांबू लागवड करता येणार आहे.

Bamboo Farming
Bamboo Farming : बांबू पीक लागवड किफायतशीर

त्या अनुषंगाने वैयक्तिक लाभार्थ्यांचे प्रस्ताव बोलाविण्यात आले होते. आतापर्यंत सोळा तालुक्यातून एक हजार ८५२ प्रस्ताव प्राप्त झाले आहे. यात सर्वाधिक २६१ मारेगाव, बाभूळगाव २१३, आर्णी १९५ प्रस्तावाचा समावेश आहे. इतर तेरा तालुक्यातून अत्यल्प प्रस्ताव दाखल झाले असून, यात वाढ व्हावी, ह्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे.

एका वृक्षासाठी मिळणार ६३४ रुपये

शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी एक हजार १११ बांबूच्या वृक्षांचे रोप देण्यात येणार आहे. प्रती वृक्ष ६३४ रुपये वृक्षाप्रमाणे देण्यात येणार असून, पाच वर्षांत सात लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यात अकुशल ७४ टक्के आणि कुशल २६ टक्के, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com