Lemon Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Lemon Farming : लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय, रासायनिक खते द्या

Fertilizer Management : पहिल्या वर्षापासून लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास वाढ चांगली होऊन, सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे शक्य होते.

Team Agrowon

Akola News : लिंबूचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी बागेला सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलीत वापर करणे फायदेशीर ठरेल, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ गजानन तुपकर यांनी व्यक्त केले.

बाळापूर तालुक्यातील मोजै पिंपळगाव येथे लिंबू पीक व्यवस्थापन या विषयावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या लिंबू पिकाच्या शेतीशाळेला आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, उपकृषी अधिकारी आर. टी. मोरे, सहायक कृषी अधिकारी ओम निलखन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री. तुपकर यांनी लिंबू फळबाग लागवडीसाठी योग्य जमीन, जातीची निवड महत्त्वाची असल्याचे सांगितले. पहिल्या वर्षापासून लिंबू पिकाला योग्य प्रमाणात सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास वाढ चांगली होऊन, सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे शक्य होते.

तसेच अन्नद्रव्य, सिंचन व्यवस्थापन, लिंबू पिकावरील कीड व रोगाबाबत चर्चा करून तांत्रिक मार्गदर्शनही केले. श्री. शेगोकार यांनी शेतीशाळेची मूळ संकल्पना सांगून शेतीशाळेची सुरुवात कृषी परिसंस्थेचा अभ्यास करून केली.

उपकृषी अधिकारी मोरे यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या फळबाग योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, ‘पोकरा’ योजना व कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली.

लिंबू पिकाची शेतीशाळा यशस्वी करण्यासाठी पाणलोट समितीचे सचिव भानुदास इंगळे, पाणलोटअंतर्गत गटाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, गजानन पातोडे, सुनील पातोडे, हिम्मत महानकार, रमेश फाळके, विनोद पातोडे इतर लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसामुळे हाहाकार

Rabi Crops Trials: राज्यात दहा हजार हेक्टरवर पीक पद्धतीवर रब्बी प्रात्यक्षिके

Marathwada Rain Update: मराठवाड्यात पावसाचा जोर

Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Rain Update Maharashtra : पावसाचे ताजे अपडेट, विदर्भ मराठवाड्यासह कोकणात अतिवृष्टी; खानदेशात शेतीपिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT