
चांगल्या दर्जाच्या उत्पादनासाठी, पिकातील पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी गंधक हे अन्नद्रव्य महत्वाचं आहे. पण पिकाला फक्त नत्र. स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. संशोधनावरून गंधक वनस्पतीच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य गणले जाऊ लागले आहे.
पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. गंधक मातीचा सामू कमी करण्याचं काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये गंधकाचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
गंधक हे पिकाच्या वाढीसाठी दुय्यम अन्नघटक असला तरी. संशोधनावरून गंधक वनस्पतीच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य गणले जाऊ लागले आहे. कारण गंधक पिकातील हरितद्रव्यनिर्मितीची आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढविण्यास मदत करते याशिवाय गंधक बीज निर्मिती प्रक्रियेमध्ये मदत करते. उच्च प्रतीच्या शेतमालाची निर्मिती होण्याकरिता मदत करते. वनस्पतीमधील पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविते. पिकामध्ये गंधक कमतरतेची लक्षणे साधारणतः पिकाच्या काढणीच्या अवस्थेत दिसून येतात. त्यामुळे जमिनीतील गंधकाची कमतरता ओळखून पुढील हंगामातील पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी प्रयत्न करता येतात.
जमिनीमध्ये गंधक कमतरतेची कारणे
मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचऱ्यामुळे जमिनीतील गंधकाचे प्रमाण घटते.
गंधकविरहित किंवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा वापर केल्यामुळे जमिनीतील गंधकाचे प्रमाण कमी होते.
शेतातील पिकांचे अवशेष, सेंद्रिय खते आणि काडी कचरा जमिनीतच न कुजवल्यामुळेही जमिनीत गंधकाची कमतरता दिसून येते.
पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे
कडधान्य वर्गीय पिकाच्या मुळावर असणाऱ्या नत्र स्थीरीकरण करणाऱ्या गाठीच्या संखेत घट होते. त्यामुळे नत्र स्थीरीकरणाचे प्रमाण कमी होते.
फळे पूर्णपणे परिपक्व होत नाहीत. पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि हरित द्रव्याची निर्मिती मंदावलेली दिसते.
रुंद पाने असलेली पिकाची पाने चुरडलेली दिसतात.
गळित धान्यातील दाण्याचा आकार, तजेलदारपणा त्यातील तेलाचं प्रमाण कमी झालेलं दिसतं.
फळातील एकूण विद्राव्य घनपदार्थांचं प्रमाण कमी होतं आणि नत्र देऊनही हिरवी होत नाहीत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.