Sugarcane Management Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Fertilizer Management : पूर्वहंगामी उसासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

Sugarcane Crop : उसासाठी रासायनिक खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्य नियोजन, योग्य मात्रा आणि योग्य वेळ फायद्याचे ठरते. माती परीक्षण करून त्याप्रमाणे खतांच्या मात्रा ठरविणे फायद्याचे ठरते.

Team Agrowon

डॉ. प्रीती देशमुख, डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अशोक कडलग

Sugarcane Fertilizers : उसासाठी रासायनिक खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्य नियोजन, योग्य मात्रा आणि योग्य वेळ फायद्याचे ठरते. माती परीक्षण करून त्याप्रमाणे खतांच्या मात्रा ठरविणे फायद्याचे ठरते.

पूर्वहंगामी ऊस अत्युच्च साखर उतारा मिळण्यासाठी महत्त्वाचा आहे. पूर्वहंगामी ऊस पिकाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी. नोव्हेंबरनंतर लागण झाल्यास थंडीमुळे उसाच्या उगवणीवर विपरीत परिणाम दिसून येतो.

फुटव्यांची संख्या अपेक्षित येत नाही. पूर्वहंगामी ऊस शेतीसाठी एकूण जो खर्च येतो त्यापैकी ३० ते ३५ टक्के खर्च रासायनिक खतांसाठी होतो. ऊस उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वाढ या वाढीच्या चार अवस्था आहेत.

पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार नत्र स्फुरद आणि पालाश या अन्न घटकाची गरज किती असते आणि अन्न घटकांचे कार्य विचारात घेऊन रासायनिक खते देण्याच्या वेळा निश्‍चित केलेल्या आहेत. कित्येक वेळा शास्त्रीय दृष्टिकोनातून रासायनिक खतांचा वापर केला जात नाही.

रासायनिक खतांचा वापर किफायतशीर होण्यासाठी खतांचे योग्य प्रकारे नियोजन व आधुनिक तंत्राचा वापर करणे फायद्याचे ठरते. त्यामध्ये योग्य निवड, योग्य मात्रा, योग्य वेळ, योग्य पद्धत या गोष्टींचा समावेश होतो. शास्त्रीयदृष्ट्या मातीचे परीक्षण करून त्याप्रमाणे खतांच्या मात्रा ठरविणे फायद्याचे ठरते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१) पूर्वहंगामी ऊस पिकाचा कालावधी हा १३ ते १४ महिन्यांचा असतो. उत्पादकता ही जास्त असल्यामुळे अन्नद्रव्यांची गरज जास्त असते.

२) पूर्वहंगामी उसासाठी १३६ किलो नत्र, ६८ किलो स्फुरद व ६८ किलो पालाशची प्रति एकरी शिफारस आहे. त्याचप्रमाणे को-८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्के जास्त म्हणजे १६० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश प्रति एकरी याप्रमाणे द्यावी.

४) पूर्वहंगामी ऊसवाढीच्या अवस्थेप्रमाणे रासायनिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे.

पूर्वहंगामी उसासाठी रासायनिक खतमात्रा देण्याचे वेळापत्रक

(शिफारशीत खतमात्रा : १३६:६८:६८ किलो नत्र: स्फुरद: पालाश आणि ८ टन शेणखत प्रति एकरी)

टीप ः वरील खत मात्रा उदाहरणादाखल दिली आहे. माती परीक्षण करून उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून रासायनिक खतांचा वापर करावा.

संपर्क ः डॉ. प्रीती देशमुख, ९९२१५४६८३१

(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT