Animal Care Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Care: पशुधनासाठी संतुलित आहार महत्त्वाचा : पोळ

Livestock Health Management: पावसाळ्यातील ओलसर वातावरणामुळे जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, कासदाह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. बारामती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डी. आर. पोळ यांनी जनावरांना संतुलित आहार, गोठ्याची स्वच्छता आणि प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

Team Agrowon

Pune News: पावसाळ्यात संकरित गाई आणि म्हशींच्या आरोग्यासाठी स्वच्छता, संतुलित आहार आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. चारा हवेशीर ठेवावा. त्यामध्ये बुरशी वाढणार नाही याची काळजी घ्यावी. बहुतांश वेळा चारा एकावर एक रुचून ठेवल्यानंतर आर्द्रतेमुळे त्यामध्ये बुरशी वाढते. अशा चाऱ्यापासून जनावरांना विषबाधा होऊ शकते, असे मत बारामती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डी. आर. पोळ यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यामध्ये संकरित गाई आणि म्हशींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. ओलसर वातावरणामुळे जिवाणू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे जनावरांना विविध आजारांचा धोका संभवण्याची शक्यता असते. योग्य आहार, गोठ्याचे व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपायांद्वारे या आजारांवर नियंत्रण ठेवता येते, ज्यामुळे दूध उत्पादनात सातत्य राखले जाऊ शकते, असे श्री. पोळ यांनी सांगितले.

पावसाळ्यात घटसर्प, फऱ्या, खुरांचे आजार, कासदाह आणि पोटाचे विकार यांसारखे आजार पसरण्याची शक्यता असते. कासदाहामुळे सड सुजते आणि दूध उत्पादन घटते. आर्द्रता आणि ओलसरपणामुळे संकरित गाई आणि म्हशींसाठी पावसाळा हा ऋतू आव्हानात्मक ठरतो.

दूध उत्पादनावर परिणाम

पावसाळ्यातील आजारांचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. कासदाह आणि पोटाचे विकार यामुळे दूध उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकंते. योग्य व्यवस्थापन आणि वेळीच उपचार केल्यास हे नुकसान टाळता येते.

आहार व्यवस्थापन

पावसाळ्यात दुधाळ जनावरांना संतुलित आहार देणे गरजेचे

जास्त हिरवा चारा टाळावा, कारण यामुळे मायांग बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते.

हिरवा चारा, वाळलेला चारा आणि खुराक यांचे योग्य मिश्रण द्यावे.

आहारात कॅल्शिअम आणि स्फुरदाचे प्रमाण २:१ ठेवावे, चयापचयाचे आजार टाळता येतील.

स्वच्छ आणि ताजे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे.

प्रतिबंधात्मक उपाय

आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी गोठ्याची स्वच्छता महत्त्वाची

गोठा कोरडा, दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवून हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा.

आठवड्यातून एकदा गोठ्यात जंतुनाशकाची फवारणी, भिंतींवर चुन्याचा थर द्यावा.

पावसाळ्यापूर्वी घटसर्प लसीकरण आणि नियमित जंतूनाशक देणे आवश्यक आहे.

बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा भाव दबावात; सोयाबीन स्थिरावले, संत्रा आवक टिकून, गहू नरमला तर डाळिंबाला उठाव

Leopard Attack: बागलाणात बिबट्याच्या हल्ल्यात सात मेंढ्या ठार

Milk Adulteration: दुधातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती

Crop Loan: पीक कर्ज भरण्याची तारीख ३१ मार्च ऐवजी ३० जून करा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Pre Monsoon Rain: आजपासून ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यभरात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT