Animal Vaccination: मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरणाला गती

Animal Disease Control: पावसाळ्यात पशुधनाला होणारे आजार नियंत्रित ठेवण्याबरोबरच त्यांना निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरणाला गती दिली आहे.
FMD Vaccination
Animal VaccinationAgrowon
Published on
Updated on

Pune News: पावसाळ्यात पशुधनाला होणारे आजार नियंत्रित ठेवण्याबरोबरच त्यांना निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने मॉन्सूनपूर्व पशुधन लसीकरणाला गती दिली आहे. हंगामात आतापर्यंत दोन लाख २ हजार ९३७ पशुधनाला घटसर्प आणि ३२ हजार ८८० जनावरांना फऱ्याचे लसीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

डॉ. गर्जे म्हणाले, ‘‘पावसाळ्यापूर्वी सर्व पशुधनांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने दुधाळ आणि गाभण पशुधनाचा समावेश आहे. पावसाळ्यात दुधाळ पशुधन आजारी पडू नये आणि आजारी पडल्यावर दूध घटू नये यासाठी दुधाळ पशुधनाला प्राधान्य दिले जात आहे. सर्वच तालुक्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. काही दिवसांत संपूर्ण पशुधनाचे लसीकरण पूर्ण होईल.’’

FMD Vaccination
Animal Vaccination : शिरोळ तालुक्यात ४० हजार जनावरांना लसीकरण

विविध तालुक्यांमध्ये इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ३६ हजार ६७ जनावरांना घटसर्प लस देण्यात आली आहे, तर फऱ्या लसीकरणातही हाच तालुका ५ हजार ८०० जनावरांसह आघाडीवर आहे. ही मोहीम शेतकऱ्यांच्या पशुधनाचे संरक्षण करून त्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाच्या लसीकरणासाठी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आग्रह धरावा आणि आपल्या पशुधनाचे आरोग्य सुरक्षित करावे,’’ असे आवाहन डॉ. गर्जे यांनी केले आहे.

घटसर्पाची लक्षणे

- तीव्र ताप आणि अंग थरथर कापणे

- श्वसनास त्रास, नाकातून स्राव

- गळ्याला आणि जबड्याला सूज

- जनावरांचा अचानक मृत्यू

फऱ्याची लक्षणे

- स्नायूंमध्ये सूज आणि वायू तयार होणे

- तीव्र ताप आणि लंगडेपणा

- प्रभावित भाग काळपट होणे

- पशुधनाचा जलद मृत्यू

FMD Vaccination
Animal Vaccination : लसीकरण अयशस्वी होण्याची कारणे

अशी घ्यावी काळजी

लसीकरण : सर्व पशुधनाला वेळेवर घटसर्प आणि फऱ्याची लस द्यावी. लसीकरणासाठी स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

स्वच्छता : गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी, ओलसरपणा टाळावा आणि पाण्याचा निचरा योग्य रीतीने करावा.

निरीक्षण : पशुधनामध्ये ताप, सूज किंवा असामान्य वर्तन दिसल्यास तातडीने पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.

पौष्टिक आहार : पशुधनाला संतुलित आहार देऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी.

पृथक्करण : आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे, जेणेकरून संसर्ग पसरू नये.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पुणे तालुकानिहाय झालेले लसीकरण (२० जूनपर्यंत)

तालुका........घटसर्प.......फऱ्या

जुन्नर.........१८,३७७......३२२६

आंबेगाव.......८६६५........१६००

खेड..........१९,५००......३१५०

मावळ.........११,६००......१३३०

मुळशी..........६९३७.......११३७

वेल्हा...........४४१९........७५३

भोर............९०१३.......१४४१

पुरंदर...........११,२५०.......१९२०

हवेली..........१४,४२०........२४३५

शिरूर..........२५,५७७........४४५८

दौंड...........१४,१५५........२२९९

बारामती........१८,७०७.........३३३१

इंदापूर.........३६,०६७.........५८००

पावसाळ्यापूर्वी लसीकरण पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घटसर्प आणि फऱ्या हे आजार जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील पशुवैद्यकीय केंद्रांशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे.
डॉ. विष्णू गर्जे,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com