Bajari Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Bajari Production : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील वाडा मंडळ कार्यक्षेत्रात उन्हाळी बाजरीचे क्षेत्र वाढले आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील वाडा मंडळ कार्यक्षेत्रात उन्हाळी बाजरीचे क्षेत्र वाढले आहे. उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते. यंदा १५१५ हेक्टरवर उन्हाळी बाजरीचे पीक फुलोऱ्यात आहे,’’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी दिली आहे.

बाजरी हे पीक तसे खरीप हंगामातील पिक मात्र पावसाळ्यात अनिश्चित पडणारा पाऊस त्यातच कधी मुसळधार तर कधी पंधरा पंधरा दिवस पावसाची दडी यामुळे बाजरीच्या पिका पासून शास्वत असे उत्पन्न मिळत नाही.

या शिवाय खेडचा पश्चिम पट्टा हा अतिवृष्टीचा असल्याने या भागात पावसाळ्यात बाजरीचे पीक शक्यच नसल्याने या भागात बाजरीचे पीक घेतले जात नव्हते. मात्र चास कमान धरणाच्या पाण्यामुळे या पट्ट्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिके घेणे शक्य झाल्याने गेली काही वर्षापासून उन्हाळी बाजरीच्या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळालेला दिसून येत आहे.

चिखलगाव येथील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब गोपाळे म्हणाले, की उन्हाळ्यात बाजरीचे पीक आमच्याकडे हमखास येत असून अवकाळी पावसाचा तडाखा न बसल्यास पिकातून चांगले उत्पन्न मिळते.

पावसाळ्यात शंभर टक्के भाताच्या लागवडी होत असल्यातरी उन्हाळ्यात सर्वच ठिकाणी आता उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते. कारण बाजरीमुळे वर्षभराच्या धान्याची चिंता मिटतेच या शिवाय बाजरीचा बाजारभाव चांगला असल्याने पैसेही मिळतात.

उन्हाळ्यात दरवर्षी खेडच्या पश्चिम पट्यात उन्हाळी बाजरीचा चढता आलेख असून, २०२२ ला हे क्षेत्र १२५ हेक्टर एवढे होते, मागील वर्षी २०२३ ला १८६.७० हेक्टरवर गेले तर चालू वर्षी हे क्षेत्र १८७.५० हेक्टरवर गेले आहे.
- भाऊसाहेब मराडे, मंडलअधिकारी, वाडा मंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT