Karmala Tehsil  Agrowon
ॲग्रो विशेष

Tehsil Office : करमाळा तहसीलप्रश्नी बहुजन संघर्ष सेनेची निदर्शने

Team Agrowon

Karmala News : करमाळा तहसील कार्यालय शहराबाहेर करण्यास लोकांचा विरोध आहे. नुकतेच मौलालीमाळ येथे गुळसडी रस्त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते या कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

याला विरोध दाखवण्यासाठी बहुजन संघर्ष सेनेने करमाळा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने केली. यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

यावेळी अंगद लांडगे, कालिदास कांबळे, भीमराव घाडगे, अतुल चव्हाण, अभिमान गायकवाड, रामभाऊ नलवडे, दत्तू शिंदे, संदीप मारकड, महादेव काळे, उत्तम गायकवाड, इरफान शेख, अनिल जगदाळे, श्रीराम सुरवसे, संजय तोरमल, पांडुरंग साळुंखे, सचिन कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बहुजन संघर्षचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम म्हणाले, इंग्रजांनी बांधलेल्या तहसील कचेरीचा एकही दगड अद्याप हललेला नाही. पूर्ण इमारत सुस्थितीत आहे. मग नवीन तहसील कचेरी बांधण्याचा निर्णय कशासाठी घेतला, हा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.

ॲग्रो विशेष

सध्याच्या तहसील परिसरात जागा उपलब्ध असताना देखील करमाळा तहसील कार्यालय व इतर कार्यालये करमाळा शहराबाहेर हलवणे योग्य नाही. सर्वसामान्य जनतेचा या प्रक्रियेला विरोध आहे. तहसील कार्यालयात अपुरी कर्मचारी संख्या आहे.

आमदार संजय शिंदे यांनी कर्मचारी संख्या वाढवावी व तालुक्यातील जनतेची तहसील कचेरीमधील रखडलेली कामे मार्गी लावावीत. दप्तर दिरंगाई होणार नाही याची दखल घ्यावी व मौलालीमाळ येथे भूमिपूजन केलेले कार्यालय तहसील परिसरात बांधावे यासाठी पुढाकार घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT