Kagal Tehsil Flood
Kagal Tehsil Floodagrowon

Kagal Tehsil Flood : भराव हटाव... शेती बचाव...! कागलमधील शेतकऱ्यांचा नारा, पिलर उभारण्याची मागणी

Kagal Flood : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली नदीकिनारा, बानगे, बस्तवडे, बाचणी, मुरगूड, वाघापूर, नानीबाई चिखली अशा सर्वच ठिकाणी पाणी आल्याने मार्ग बंद झाले.
Published on

Kolhapur Flood : कागल तालुक्यातील वेदगंगा, दूधगंगा नद्यांवरील सर्वच बंधारे आणि पुलांवर महापुराचे पाणी आले, तर काही पुलांच्या दोन्ही बाजूंना रस्त्यावर पाणी आले. नदीवर पूल बांधताना दोन्ही बाजूंना टाकलेल्या भराव्यांमुळे तालुक्यात तब्बल दोन हजार हेक्टरमधील पिके दहा दिवस पाण्याखाली राहिल्याने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे पुलांचे भराव काढून तेवढ्याच उंचीचे पिलर उभारण्याच्या मागणीसाठी ‘भराव हटाव... शेती बचाव...’ या टॅगलाईनखाली शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

गेल्या वर्षी पावसाळ्यात केवळ दीडशे हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. यावर्षी १३ ते १४ पट जादा क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पूररेषेच्या आत भरावा, बांधकाम अशा पद्धतीची कामे करायची नसताना इमारतीही उभारल्या गेल्या आहेत. धरण जुलैमध्ये ५० टक्केच भरायचे, असा नियम असताना सर्व धरणे १०० टक्के भरून घेतली आहेत. धरणांतून विर्सग आणि संततधार पावसामुळे नदीकाठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशावेळी दक्षता व गुणनियंत्रण कक्ष काय करतो, हा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली नदीकिनारा, बानगे, बस्तवडे, बाचणी, मुरगूड, वाघापूर, नानीबाई चिखली अशा सर्वच ठिकाणी पाणी आल्याने मार्ग बंद झाले. या ठिकाणी पुलांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. हे पूल, बंधारे बांधताना भरावाच्या ठिकाणी पिलर उभारून पाणी जाण्यासाठी मार्ग केलेले नाहीत. मुरगूड-निढोरी मार्गावर चार ते पाच फूट पाणी येते. या ठिकाणी तेवढ्याच उंचीचे पिलर उभारणे गरजेचे आहे.

Kagal Tehsil Flood
Landslides Spots Kolhapur : 'वायनाड'च्या वाटेवर कोल्हापूर ?, भूस्खलनाच्या धोक्यावर ८९ ठिकाणे

कागलमध्ये नागोबाचा ओढा व तहसील कार्यालयासमोरील बोगद्यात नेहमीच पाणी साचते, याकडेही दुर्लक्ष आहे. बाचणी येथील १० कोटींचा पूल पूर्ण होण्यापूर्वीच पुरात बुडाला आहे. पुरामुळे शेतकरी, मालवाहतूक, शिक्षण आणि नोकरदार यांचे नुकसान दरवर्षी होत आहे. त्यामुळे पावसाळा आला की सर्वांच्याच पोटात गोळा येतो.

पावसाचे प्रमाण पाहून धरणांतील विसर्ग वाढविण्यात आला. परंतु हेच काळम्मावाडी धरणातील पाणी डावा व उजव्या कालव्यातून सोडले असते तर नद्यांना येणाऱ्या महापुरावर नियंत्रण राखणे शक्य होते व नुकसान टाळता आले असते असे बांधकाम अभियंता जोतिराम सूर्यवंशी यांनी मत व्यक्त केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com