Bacchu Kadu Agrowon
ॲग्रो विशेष

Bachchu Kadu: बच्चू कडूंची ‘सात-बारा कोरा’ पदयात्रा

Saat Bara Kora Padayatra: शेतकरी कर्जमाफीसंदर्भात शासन वेळकाढूपणाचे धोरण राबवत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पाच जुलैपासून ‘सात-बारा कोरा’ पदयात्रा जाहीर केली आहे.

Team Agrowon

Amravati News: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात शासनाची भूमिका वेळकाढूपणाची दिसत आहे. त्यामुळेच या मुद्यावर शासनाला पुन्हा जागृत केले जाईल. त्यासाठी पाच जुलैपासून डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळपासून देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या चिलगव्हाणपर्यंत (जि. यवतमाळ) पदयात्रा काढणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.

शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी (ता.२४) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी काही दिवसांपूर्वी श्री. कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्याची दखल घेत काही मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मकता दर्शविण्यात आली. कर्जमाफीसाठी समिती स्थापन करून, या समितीच्या अहवालाआधारे सात-बारा कोरा करणार, असे सांगण्यात आले. परंतु या संदर्भाने शासन पातळीवर काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळेच पाच जुलैपासून १३८ किलोमीटर ‘सात-बारा कोरा पदयात्रा’ काढणार असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले.

दरम्यान, आश्‍वासनाच्या बळावर बेमुदत अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यास भाग पाडून सरकारने फसवणूक केली आहे का, असा प्रश्‍न केला असता, श्री. कडू म्हणाले, की ही माझी नाही तर मायबाप शेतकऱ्यांची फसवणूक ठरेल. त्याचे परिणाम मतपेटीतून सत्ताधाऱ्यांना दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील कर्जमाफीबद्दल अनभिज्ञ असल्यासारखे बोलत होते. अशी काही घोषणाच केली नसल्याचे ते सांगत होते. आता मात्र त्यांचा सूर बदलला असून समिती स्थापन करण्याविषयी ते जाहीरपणे सांगत आहेत. पावसाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर करावी, असेही ते म्हणाले.

अदानी, अंबानीसह इतर उद्योगपतींचे कर्ज माफ करताना सरकारला कधीच समिती स्थापन करावीशी वाटली नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ न मागताच दिला. मग शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देतानाच सरकारला अभ्यास का करावा लागतो हे अनाकलनीय आहे.
बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्‍ती पक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: राज्यात ४ दिवस पावसाची उघडीप राहणार; शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Weekly Weather: बहुतांश जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता

Samruddha Panchayat Raj : ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये अकोल्याने लौकिक वाढवावा

Dairy Farming: दुधातील फॅट, एसएनएफवर परिणाम करणारे घटक

Crop Damage : शेतकऱ्यांचा दलदलीशी होतोय सामना

SCROLL FOR NEXT