Bacchu Kadu Strike: बच्चू कडूंच्या उपोषणाचा चौथा दिवस, सरकारला थेट निर्णयाचा इशारा

Hunger Strike Update: शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी बच्चू कडू यांचे उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे ते अन्नत्याग आंदोलन करत असून सरकारला ठोस निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Bacchu Kadu Movement
Bacchu Kadu MovementAgrowon
Published on
Updated on

Pune News: शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी बच्चू कडू यांचे उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे ते अन्नत्याग आंदोलन करत असून सरकारला ठोस निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, विविध ठिकाणी प्रहार कार्यकर्त्यांनी आंदोलने करत सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेचआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक प्रहार कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. १०) चांदूरबाजार तहसील कार्यालयात मुंडण आंदोलन केले, तर पूर्णा प्रकल्पावर विश्रोळी जलाशयात जलसमाधी आंदोलन केले होते.

Bacchu Kadu Movement
Bachhu Kadu Movement: कर्जमाफी, मनरेगामधून शेतीकामे, शेतमजुरांना विम्यासाठी बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन

या आंदोलनातील आज चौथ्या दिवशी महसूलमंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना फोन करून "जमत असेल तर उपोषण सोडा, नाही तर राहू द्या" असे बच्चू कडू यांनी सांगितले. परंतू बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळले असून,  कडू यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचे बावनकुळे म्हणत आहे. 

पुढे बच्चू कडू म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत राहू, सरकारने आपले काम करावे आणि आम्ही आमचे काम करू. यावेळी  कडूंनी स्पष्ट केले की, शेतकरी, दिव्यांग आणि कष्टकरी वर्गाला न्याय मिळत नाही त्यावर सरकार योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही.

Bacchu Kadu Movement
Bacchu Kadu : बच्चू कडूंची घेतली शरद पवारांची भेट; दिव्यांगांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे बच्चू कडू यांची प्रकृती बिघडली असून, अन्नत्यागामुळे त्यांचे वजनही घटले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया न आल्याने कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणून  प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील मंत्रालय परिसरात आंदोलन केले.

या आंदोलनात अनेक दिव्यांग व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, त्यांनी आपल्या मागण्यांसाठी घोषणा देत सरकारविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर टीका करत म्हटले आहे की, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच राहतात, आम्हाला आता निर्णय आणि अंमलबजावणी हवी आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com