Soil Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Soil Fertility : ‘‘अनियंत्रित खत आणि पाण्याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर आवश्यक आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘अनियंत्रित खत आणि पाण्याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर आवश्यक आहे. याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी अक्षय कृषी परिवाराच्या वतीने पश्‍चिम महाराष्ट्रातील १५० गावांमध्ये भूमी सुपोषणासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे,’’ अशी माहिती कृषिभूषण जगन्नाथ मगर यांनी दिली.

गोसेवा गतीविधी पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत गो-आधारित शेती सहप्रमुख पूनम राऊत, मधुकर भोसले हे या वेळी उपस्थित होते. श्री. मगर म्हणाले, ‘‘पीक उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. आपल्याकडील जमिनीची धूप होत आहे.

सेंद्रिय कर्ब कमी होत चालला आहे. यासाठी जमिनीचे योग्य पद्धतीने संवर्धन आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन देशातील विविध प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन भूमी सुपोषणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हजारो गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रमाद्वारे मृदा पोषण आणि संवर्धन कार्याला चालना देण्यात आली आहे.’’ राऊत म्हणाल्या, ‘‘जमीन सुपीकता आणि मनुष्य, पशूंचे आरोग्य जपण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम सुरू आहे.

यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, एकात्मिक पीक पद्धती, पीक पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT