PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

Oilseeds Research Award : ‘पंदेकृवि’च्या तेलबिया संशोधन केंद्राला पुरस्कार

 गोपाल हागे

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तेलबिया संशोधन केंद्रात अखिल भारतीय समन्वयीत भुईमूग प्रकल्पाच्या माध्यमातून भुईमुगावर संशोधन होत आहे. भुईमुगाचा टीएजी ७३ हा नवीन वाण विकसित केला आहे.

या कामाची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या जुनागढ येथील भुईमूग संशोधन संचालनालयाने भुईमूग पीकातील संशोधनाबद्दल ‘पंदेकृवि’च्या तेलबिया संशोधन केंद्राला पुरस्कृत केले आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वात व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात तेलबिया संशोधन केंद्राने भुईमूग पीक संशोधनामध्ये प्रयत्न चालवले आहेत. भुईमूग पिकाखालील क्षेत्र वाढीसाठी काम होत आहे. तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष गहुकर, डॉ. मनीष लाडोळे व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागातून भुईमुगाचा टीएजी ७३ हा नवीन वाण विकसित केला आहे.

तेलबिया संशोधन केंद्रातून आतापर्यंत भुईमुगाचे सहा वाण विकसित करण्यात आले आहेत. पीक उत्पादन व पीक संरक्षणासंदर्भात शेतकरी उपयोगी शिफारशीदेखील देण्यात आलेल्या आहेत. अलीकडच्या काळात विकसित केलेला टीएजी ७३ हा वाण अधिक उत्पादनक्षम असून, उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या संशोधन केंद्रामार्फत भुईमूग लागवडीसंदर्भात तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार तसेच शेतकऱ्यांना स्वतःचे शेतीसाठी लागणारे भुईमुगाचे बियाणे स्वतः तयार करण्यासाठी ‘PDKV Seed Method’ चा अवलंब करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

या सर्व बाबींची दखल घेऊन जयपूर येथे आयोजित अखिल भारतीय भुईमूग कार्यशाळेमध्ये ‘पंदेकृवि’च्या तेलबिया संशोधन केंद्राला भुईमूग पिकासाठी उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून पुरस्कृत करण्यात आले. तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संतोष गहुकर व डॉ. मनीष लाडोळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT