PDKV Nagpur : ‘पंदेकृविची’ची आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल

Fruit Cultivation : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पहिल्यांदाच आर्थिक स्वावलंबनाची वाट चोखाळत तब्बल १०० एकरांवर फळबाग लागवड केली आहे.
PDKV Fruit Cultivation
PDKV Fruit CultivationAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पहिल्यांदाच आर्थिक स्वावलंबनाची वाट चोखाळत तब्बल १०० एकरांवर फळबाग लागवड केली आहे. विशेष म्हणजे यातील ७० टक्‍के क्षेत्र पडीक होते.

याच क्षेत्रातून वर्षाला तब्बल एक कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याचा मानस आता व्यक्‍त करण्यात आला आहे. कापूस कार्यशाळेच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर असलेल्या कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी याविषयी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला.

PDKV Fruit Cultivation
PDKV Akola : ‘पंदेकृवि’ला तीन नव्या प्रकल्पांना मान्यता

कृषी विद्यापीठाच्या शेतालगतचे शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार तर विद्यापीठाची जमीन पडीक अशी स्थिती अनेक भागांत होती. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या लेखी विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती ठरला होता. वर्षानुवर्षाचे हे चित्र बदलण्यासाठी डॉ. गडाख यांनी पुढाकार घेतला. त्यांच्याच मार्गदर्शनात अकोला शहरालगतच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या परिसरात फळबाग लागवडीचा मेगा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

त्या अंतर्गत १०० एकरांवर फळबाग लागवड केली आहे. त्यातील ५० एकरांवर नागपुरी संत्रा, उर्वरित ५० एकरांवर सीताफळ (बालानगर), जांभूळ (कोकण बारडोली), पेररू (एल-४९), अंजीर (पुणे), आंबा (केसर), चिकू (कालीपत्ती) याप्रमाणे लागवड केली आहे.

२०२१ पासून टप्प्याटप्प्याने फळबाग लागवडीस सुरुवात करण्यात आली. तसेच रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्यासाठी सायफन पद्धतीचा वापर केला आहे. त्यामुळे विजेची देखील बचत होते. केवळ वरील बाजूस असलेल्या टाक्‍यांपर्यंत या निविष्ठा पोहोचविण्यासाठी वीज पंपाचा वापर होतो.

त्यानंतर मात्र संपूर्ण १०० एकरांवरील क्षेत्रात हे पसरविण्याचे काम विजेविना होते. संत्रा पिकाला पाणी देण्यासाठी ऑटोमायझेशन पद्धतीचा वापर केला आहे. विशेष म्हणजे प्रकल्प राबविणारे डॉ. गोविंद जाधव यांनी अनेक ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ अंतर्गत पैशाच्या बचतीचा उद्देशही साधला आहे.

PDKV Fruit Cultivation
PDKV Shiwarferi : फळे, भाजीपाला, फूलवर्गीय पिकांतूनच समृद्धी : प्रभातकुमार

साडेसात कोटी रुपयांचा खर्च

१०० एकरांवरील फळबाग लागवडीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून साडेसात कोटी रुपयांचा निधी विद्यापीठाला मिळाला आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात उपसंचालक (बियाणे) डॉ. आम्रपाली आखरे, उपसंचालक (उद्यानविद्या) गोविंद जाधव यांच्या नेतृत्वात या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

फळझाडांची संख्या

संत्रा : १०२८०

पेरू : ३७००

चिकू : ४००

सीताफळ : ३७००

अंजीर : ४००

केसर आंबा : ११००

जांभूळ : ५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com