PDKV Seed Research Centre
PDKV Seed Research CentreAgrowon

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

PDKV, Akola : बंगळूर येथे कृषी विज्ञान विद्यापीठात झालेल्या ३९ व्या दोनदिवसीय वार्षिक सभेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राला देशपातळीवरील संशोधन कामगिरीसाठी उत्कृष्ट केंद्र म्हणून पुरस्कृत करण्यात आले.
Published on

Akola News : बंगळूर येथे कृषी विज्ञान विद्यापीठात झालेल्या ३९ व्या दोनदिवसीय वार्षिक सभेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राला देशपातळीवरील संशोधन कामगिरीसाठी उत्कृष्ट केंद्र म्हणून पुरस्कृत करण्यात आले.

भारतीय कृषी संशोधन केंद्राच्या (आईसीएआर) अंतर्गत भारतीय बीज विज्ञान संस्थेद्वारे संचालित अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (बियाणे) या संस्थेअंतर्गत ६५ गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादन केंद्रे आणि २४ बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्र समाविष्ट आहेत.

याअंतर्गत ही सभा झाली. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पीक विज्ञान विभागाचे उप-महानिदेशक डॉ. तिलकराज शर्मा यांच्या हस्ते कृषी विद्यापीठाच्या संशोधन उपसंचालक (बियाणे) डॉ. आम्रपाली अतुल आखरे, शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव मते, डॉ. गजानन लांडे, अभिलाषा खारकर यांनी पुरस्कार स्वीकारला. सहायक महानिदेशक (बियाणे) डॉ. डी. के. यादव, भारतीय बीज विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. संजय कुमार व इतर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

PDKV Seed Research Centre
Vegetable Research Centre : एकार्जुना येथे होणार भाजीपाला संशोधन केंद्र

या वर्षी गुणवत्तापूर्ण पैदासकार बियाणे निर्मितीत महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात ‘पंदेकृवि’ अग्रस्थानी आहे. विद्यापीठाद्वारा संशोधित सर्व तंत्रज्ञान हे प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंचांची स्थापना करण्यात आली आहे.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंदेकृवि, अकोला

या पुरस्कारामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बियाणे संशोधन अधिकारी डॉ. आम्रपाली आखरे व त्यांच्या चमूने सदर विभागास साधन संपन्न करून संशोधनाचे बळकटीकरण करण्यात यश मिळवले आहे.

तसेच सदर विभागाची बियाणे चाचणी प्रयोगशाळा ही महाराष्ट्र राज्य अधिसूचित असून, तिचे बळकटीकरण करण्याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत प्रकल्पदेखील मंजूर करण्यात आला आहे.
डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, पंदेकृवि, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com