ॲग्रो विशेष

Eknath Shinde : शेतकऱ्यांशिवाय देशाचा उत्कर्ष अशक्य

Agriculture Award : शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय महाराष्ट्र नव्हे, तर भारताच्या विकासाचा विचार होऊ शकत नाही. सरकार शेतकऱ्यांना मायबाप अन्नदाता मानणारे आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : ‘‘शेतकऱ्यांच्या योगदानाशिवाय महाराष्ट्र नव्हे, तर भारताच्या विकासाचा विचार होऊ शकत नाही. सरकार शेतकऱ्यांना मायबाप अन्नदाता मानणारे आहे. त्यामुळे पर्यावरणीय बदलाच्या काळात दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वप्नातील हरित महाराष्ट्र आकाराला आणला पाहिजे,’ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री. शिंदे बोलत होते. या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल प्रमुख उपस्थित होते.

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे कृषी दिन वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण सोहळा २०२४ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे शेतकरी पुत्र होते. त्यांना शेतकऱ्यांच्या श्रमाची, कष्टाची जाणीव होती. अन्नधान्याच्या टंचाईत त्यांनी विविध योजना राबविल्या. संकरित ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले. हरित क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने मिशन बांबू लागवड सुरू केले आहे. बांबू हे हिरवे सोने असून, त्यापासून विविध उत्पादने तयार केले जातात. त्यामुळे राज्यात एकूण २१ लाख हेक्टर क्षेत्रात बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कृषिमंत्री मुंडे म्हणाले, की वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद आहे. वसंतराव नाईक यांनी सुरू केलेली रोजगार हमी योजना देशाला मार्गदर्शक ठरली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा देण्यात येतो. त्याचा शेतकरी बांधवांना लाभ होत आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. कृषी पुरस्कार विजेत्यांपासून प्रेरणा घेत अन्य शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करतील.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष बारवाले यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांची पार्श्‍वभूमी विशद केली. सचिव दीपक पाटील यांनी आभार मानले. या वेळी आमदार नीलय नाईक, आमदार राजेश राठोड, आमदार इंद्रनील नाईक, राहुरी येथील महात्मा जोतिराव फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, सचिव दीपक पाटील, विश्‍वस्त डॉ. आनंद पटवर्धन, मुश्ताक अंतुर्ले आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT