Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा कंपन्यांकडून ‘अग्रिम’ देण्यास टाळाटाळ

Crop Insurance Scheme : यंदा ऑगस्टमध्ये पावसाचा खंड व त्या महिन्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादनावर थेट परिणाम झालेला आहे.

Team Agrowon

Akola News : या हंगामात लागवड असलेल्या सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटका बसलेला आहे. तरीही नुकसान भरपाई म्हणून अग्रिम देण्याबाबत विमा कंपन्या पुन्हा एकदा टाळाटाळ करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागीय आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीमध्ये विमा कंपनी अग्रिम विषयावरून नकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

यंदा ऑगस्टमध्ये पावसाचा खंड व त्या महिन्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादनावर थेट परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकासाठी विमा कंपन्यांनी अग्रिम रक्कम द्यावी, असे प्रत्येक जिल्हा समित्यांनी कंपन्यांना सुचवले आहे. याबाबत अधिसूचनासुद्धा काढलेल्या आहेत. परंतु याविरुद्ध कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले.

अकोल्यात या खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे दोन लाख १६ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. यासाठी राज्य व केंद्र हिस्सा म्हणून विमा कंपनीला तब्बल २५६ कोटी रुपये मिळतील. यात राज्याचा १४० कोटींचा वाटा आहे.

सोयाबीन पिकासाठी जोखीम स्तर हेक्टरी ४० हजारांपर्यंत आहे. असे असताना विमा कंपनीला २५ टक्के अग्रिम द्यायचा झाल्यास मिळणाऱ्या प्रीमियमपेक्षा ही रक्कम बरीच कमी राहते. तरीही कंपन्या नियमांवर बोट ठेवत शेतकऱ्यांना मदत द्यायची कशी टाळता येईल, याबाबत प्रयत्न करीत आहेत.

सोमवारी (ता. ९) अमरावती विभागीय आयुक्तालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हीच बाजू मांडली. तर कृषी विभागाने शेतकऱ्यांना नुकसानीमुळे २५ टक्के अग्रिम कंपनीने द्यावा, अशी ठोस भूमिका मांडली. आयुक्तांनी कृषी विभाग व विमा कंपनीला आपले म्हणणे लेखी सादर करण्याबाबत सांगितले. आता त्यांच्या निर्णयावर ‘अग्रिम’चे भवितव्य ठरेल.

२१ दिवस खंडाचा उल्लेख नाही

दुष्काळ संहितेत २१ दिवसांचा पाऊस कालखंडाचा कुठेही उल्लेख नाही. मात्र या मुद्यावर अधिक भर दिला जात आहे. वास्तविक संबंधित महिन्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेला असेल तर मदत देता येते.

कारण पाऊस कमी झाल्याने थेट उत्पादनाला फटका बसतो. पीकविमा कंपन्यांकडून नेमका २१ दिवस सलग खंडाचा मुद्दा लावून धरला जात आहे. वास्तविक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या काळात मदत करणे जबाबदारी असतानाही कंपन्या यापासून दूर जात स्वतःचा फायदा पाहत असल्याबाबत कृषी खात्यातील अधिकारीही नाराजी व्यक्त करीत आहेत.

अकोल्यातील विमा आकडेवारी

एकूण विमा संरक्षित क्षेत्र ३ लाख ४५ हजार ७१० हेक्टर

शेतकरी हिस्सा ४. ४ लाख

राज्य हिस्सा १७९ कोटी

केंद्र हिस्सा १३८ कोटी, ९८ लाख

एकूण विमा हिस्सा ३१८ कोटी ३ लाख

विमा संरक्षित रक्कम १६४८ कोटी ५३ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT