Crop Insurance : परभणी जिल्ह्यात विमाभरपाईसाठी ७६ हजारांवर पूर्वसूचना

Crop Insurance Intimation : पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटी) या जोखीम बाबीअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७६ हजार ३०२ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत.
Benefit of Fruit Crop Insurance
Benefit of Fruit Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) सप्टेंबर महिन्यात अनेक मंडलात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटी) या जोखीम बाबीअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७६ हजार ३०२ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत. त्यापैकी ३५ हजार ६८६ पूर्वसूचना स्वीकारल्या आहेत, तर ३७ हजार ६१६ पूर्वसूचना नाकारल्या (अस्विकृत) आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील अनेक मंडलांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभे सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबद्दल विमा परतावा मंजूर करावा यासाठी आयसीआयसीआय जनरल इन्शूरन्स कंपनीकडे एकूण ७६ हजार ३०२ पूर्वसूचना (पीक नुकसान तक्रारी) दाखल केल्या आहेत.

Benefit of Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजनेचे प्रस्ताव सर्व्हरच्या समस्येने रखडले

त्यात कॉल सेंटर मार्फत दाखल २६ हजार १९८ पैकी १० हजार ३३४ पूर्वसूचना स्वीकारल्या आहेत तर १५ हजार ८६४ पूर्वसूचना रिजेक्ट (अस्विकृत) करण्यात आल्या आहेत. पीकविमा पोर्टलद्वारे दाखल ४९ हजार ७७१ पैकी २८ हजार १२२ पूर्वसूचना स्वीकारल्या, तर २१ हजार ६४९ पूर्वसूचना रिजेक्ट करण्यात आल्या आहेत. ऑफलाइन पद्धतीने दाखल ३३३ पैकी २३० पूर्वसूचना स्वीकारल्या, तर १०३ नाकारल्या आहेत.

जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ५ लाख १७ हजार ३०८ हेक्टरवर (९६.७१ टक्के) पेरणी झाली त्यात सोयाबीनची २ लाख ७१ हजार ७०८ हेक्टर पेरणी आहे. कपाशीची १ लाख ९२ हजार ५२२ हेक्टर लागवड झाली आहे.

तुरीची ३७ हजार हेक्टर, मुगाची ८ हजार ५४९ हेक्टर, उडदाची ३ हजार ८०३ हेक्टर, ज्वारीची २ हजार २२८ हेक्टर, बाजरीची ५२८ हेक्टर, मक्याची ८९० हेक्टर पेरणी झाली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७ लाख ६१ हजार ८२३ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत.

Benefit of Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपीक विम्याचे बोगस साडेचौदा हजार प्रस्ताव रद्द

एकूण ५ लाख १ हजार ६८ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत. त्यासाठी २ हजार ६१६ कोटी ४८ लाख ६४ हजार ६७ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. सोयाबीनचे ४ लाख ४१ हजार १७३ विमा प्रस्ताव आहेत.

मुगाचे ५ हजार ५७६, उडदाचे १५ हजार ७७२, तुरीचे ९७ हजार ६१७, कपाशीचे १ लाख ४१ हजार ५९६, ज्वारीचे ६ हजार ४०६, बाजरीचे ९८३ पीकविमा अर्ज आहेत. पीकविमा भरपाई मंजुरीसाठी नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार परताव्याची गणना केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पूर्वसूचना स्थिती

तालुका स्वीकृत पूर्वसूचना अस्विकृत पूर्वसूचना एकूण पूर्वसूचना

परभणी ३२९४ ४७३१ ८०२५

जिंतूर ७३८९ ९७७३ १७१६२

सेलू ३३५६ ४१४६ ८५०२

मानवत १७६१ १२९१ ३०४२

पाथरी ३३९९ २५२८ ५९२७

सोनपेठ ७०१ १३०७ २००८

गंगाखेड ४९९१ ४१८४ ९१७५

पालम ५३९७ ३३०१ ८६९८

पूर्णा ८३९८ ५३६५ १३७६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com