Weather Station Agrowon
ॲग्रो विशेष

Automatic Weather Station: गावागावांत उभारणार हवामान स्वयंचलित केंद्रे

Mahavedh Project: केंद्र सरकारच्या विंडस् (हवामान माहिती नेटवर्क डाटा सेंटर) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यासाठी महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ मंगळवारी (ता. १७) मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: केंद्र सरकारच्या विंडस् (हवामान माहिती नेटवर्क डाटा सेंटर) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यासाठी महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ मंगळवारी (ता. १७) मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

राज्यातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी यासाठी, तसेच शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन मिळावे यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा प्रकल्प कासवगतीने राज्यात राबविला जात आहे.

या प्रकल्पात राज्यात महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रांद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त होते. ही माहिती, मदत व पुनर्वसन विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर, नागपूर, सर्व कृषी विद्यापीठ,

कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संशोधन संस्था यांद्वारे वापरण्यात येते. तसेच पंतप्रधान पीकविमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना इत्यादी योजनांचा लाभ देण्यासाठी या माहितीचा आधार घेतला जातो. स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा.लि यांची या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता सेवा पुरवठादार संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.

महसूल मंडल स्तरावर महावेध प्रकल्पअंतर्गत यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात आली आहे, अशा ग्रामपंचायती वगळून अन्य ग्रामपंचायतींमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर केंद्रांची उभारणी झाल्यास दुष्काळ, आग, पूर, गारपिट, ढगफूटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे. ‘महावेध’साठी कृषी विभाग नोडल विभाग म्हणून काम करेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Department Action: कांदळवन कारवाईवर संशय

Milk Adulteration: ‘एफडीए’च्या कारवाईने दुग्ध व्यवसायात खळबळ

Women In Agriculture: ससून नवघरच्या डोंगरावर बहरली फळबाग

Village Road: पंचवीस वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद मिटला

Tur Crop Insurance: चौदा मंडलामध्ये तुरीचा २२ कोटी १३ लाख रुपये पीकविमा परतावा देय

SCROLL FOR NEXT