Medicine Agrowon
ॲग्रो विशेष

Government Hospital : शासकीय रुग्णालयात औषध खरेदीसाठी आता प्राधिकरण

Hasan Mushrif : राज्यात औषधांअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आता हाफकीनकडून औषधी खरेदी करण्याऐवजी नव्याने प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nagpur News : ‘‘राज्यात औषधांअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आता हाफकीनकडून औषधी खरेदी करण्याऐवजी नव्याने प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

त्यासह स्थानिकस्तरावर रुग्णालय प्रशासनाला एकूण खरेदीच्या ४० टक्‍के औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत,’’ अशी माहिती वैद्यकीय आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (ता.८) विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांनी या संबंधाने प्रश्‍न उपस्थित केला होता. दरम्यान, मुश्रीफ यांनी उत्तरात सांगितले की, सांगली येथील रुग्णालयात सध्या ३९० बेड आहेत. या रुग्णालयात रुग्णसंख्या वाढती असल्याने येथील बेडसंख्या ५०० केली जाणार आहे.

सांगली रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी पूर्वी निधीची तरतूद केली होती. परंतु या यंत्राची किंमत साडेदहा कोटी रुपयांवर पोचली आहे. परिणामी वाढीव निधीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घेत येत्या तीन महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.

राज्यात एमआरआय सुविधा पीपीपी तत्त्वावर शासकीय रुग्णालयात दिली जाईल. त्यानुसार सांगली येथील रुग्णालयात देखील एमआरआय बसविले जाईल.

मुख्यमंत्री प्राधिकरणाचे अध्यक्ष

‘‘राज्यात औषधे खरेदीसाठी हाफकीन संस्था होती. ती बंद करून नव्याने प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्याने या पुढील काळात राज्यात औषधांचा तुटवडा भासणार नाही,’’ अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidarbha Heat Wave: मराठवाड्यात पाऊस, विदर्भात उष्णतेचा इशारा; मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026: कोल्हापूरच्या राजकारणाला उकळी, गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरु, ठराव दाखल करण्याची तारीख ठरली

Water Scarcity: सांगलीत खानापूर तालुक्यात सहा गावांत पाणीटंचाई

Hatnur Dam Water Release: ‘हतनूर’मधून विसर्ग; अनेक गावांना दिलासा

Summer Crop Sowing: हिंगोली जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या पेरणीत ६ हजार ७०२ हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT