Employment Guarantee Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Rojagar Hami Yojana : नांदेड जिल्ह्यात ‘रोहयो’च्या कामांवर मजुरांची संख्या वाढतेय?

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध यंत्रणेच्या १०८१ कामावर दहा हजार २६९ मजूर काम करीत आहेत.

Team Agrowon

Nanded News Update : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) (रोहयो) जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध यंत्रणेच्या १०८१ कामावर दहा हजार २६९ मजूर काम करीत आहेत. यानंतर मजुरांच्या संख्येत वाढ होईल, अशी माहिती रोहयोच्या सुत्रांनी दिली.

उन्हाळ्याच्या परिस्थितीत गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतींची ९०८ कामे सुरू आहेत. येथे आठ हजार ६५९ लोकांना रोजगार देण्यात आला आहे.

तर कृषी विभागाची १०८ कामे सुरु आहेत. यावर ६९९ मजूर काम करीत आहेत. वन विभागाची ३३ कामे सुरु आहेत. या कामावर ५७५ मजूर काम करीत आहेत.

तर सामाजिक वनीकरण विभागात ३५ कामे सुरु आहेत. यावर ३३६ मजूर काम करीत आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात आज रोजी १०८१ कामावर १० हजार २६० मजूर काम करीत आहेत, अशी माहिती रोहयोच्या सूत्राने दिली.

लोहा तालुक्यात सर्वाधिक मजूर

जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर सर्वांत जास्त लोहा तालुक्यात मजूर कामावर आहेत. या तालुक्यामध्ये २२१ कामे सुरू असून तेथे दोन हजार ११८ लोकांना रोजगार देण्यात आला आहे. याशिवाय कंधार तालुक्यात १२० कामे सुरू असून तेथे १२८२, अर्धापूर तालुक्यात ९० कामावर ३९५ मजूर काम करीत आहेत.

माहूर तालुक्यात ८७ कामांवर ४३०, हिमायतनगर तालुक्यात ८४ कामांवर ७१०, नायगाव तालुक्यात ७९ कामावर ८१२, हदगाव तालुक्यात ७४ कामावर ५५९, मुखेड तालुक्यात ६७ कामावर १३४६, भोकर तालुक्यात ६१ कामावर ३०४, किनवट तालुक्यात ७२ कामावर ८८३, देगलूर तालुक्यात ५९८ मजूर कामावर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women in Agriculture : पुसा येथे जागतिक शेतकरी महिला परिषदेचे आयोजन; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

India Exports To China: भारताची चीनमध्ये निर्यात ३३ टक्क्यांनी वाढली, शेतमाल, सागरी उत्पादनांचा समावेश

Agriculture Exhibition 2026: यांत्रिकीकरणासह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने वेधले लक्ष

Solar Power Project: जालन्यात ३४१ मेगावॉट क्षमतेचे ७१ प्रकल्प मंजूर

Agrowon Exhibition 2026: कृषी उद्योग विकास महामंडळाचा महाअॅग्रो मार्ट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

SCROLL FOR NEXT