Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : अकोल्याचा ‘आत्मा’ चालतो अवघा ३० टक्के पदांवर

ATMA Project : कृषी विभागाच्या विविध योजनांच्या विस्ताराची धुरा सांभाळणाऱ्या ‘आत्मा’ विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

Team Agrowon

Akola News : कृषी विभागाच्या विविध योजनांच्या विस्ताराची धुरा सांभाळणाऱ्या ‘आत्मा’ विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. अकोल्यात अवघ्या ३० टक्के पदांवर या विभागाचा कारभार ओढला जात असून, वर्षानुवर्षे रिक्त पदांकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याची परिस्थिती आहे.

परिणामी कार्यरत असलेल्यांना मूळ ठिकाणांसह इतर भागांचाही कार्यभार ओढावा लागत आहे. शिवाय योजनांच्या अंमलबजावणीवरही त्याचे परिणाम होतात. कृषी विभागाच्या अखत्यारीत आत्मा यंत्रणा चालवली जाते. यासाठी जिल्हा स्तरावर प्रकल्प संचालक, उपप्रकल्प संचालक, नोडल अधिकारी अशी पदे शासकीय कोट्यातून दिलेली राहतात.

उर्वरित यंत्रणा की कंत्राटी स्वरूपाची नेमण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यात प्रकल्प संचालक हे एकमेवपद पूर्णवेळ भरलेले असून, उपप्रकल्प संचालकांची क्लास वन दर्जाची दोन पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत.

क्लास वन दर्जाचे नोडल अधिकाऱ्याचेही पद भरलेले नाही. जिल्ह्यात आत्मा विभागासाठी २९ पदे मंजूर असताना केवळ नऊ पदे भरलेली आहेत. कुठे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आहे, तर कुठे सहायक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकाचे पद भरलेले नाही. एकाच व्यक्तीकडे दोन-दोन तालुक्यांचा पदभार देण्यात आला.

आत्मा यंत्रणेमार्फत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती, परंपरागत कृषी विकास, सेंद्रिय शेती, स्मार्ट, पंतप्रधान कृषी सिंचन, आत्मा योजनांच्या विविध योजनांची धुरा सांभाळली जाते. रिक्त पदांमुळे ही कामे मोठ्या जिकिरीने ओढली जात आहेत.

वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष

कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अकोल्यात आत्मा यंत्रणेची पदे भरण्याबाबत वरिष्ठांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याला अद्यापही यश आलेले नाही. कुठलीही पदे भरली जात नाहीत.

असलेल्यांकडूनच अधिकाधिक कामांची अपेक्षा ठेवली जात आहेत. या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. या बाबत अद्याप कुठल्याही लोकप्रतिनिधीने हा विषय गांभिर्याने घेतलेला नसल्याने वरिष्ठ अधिकारी फारसे लक्ष देण्यास तयार नाहीत, ही वस्तुस्थिती तयार झालेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Industry Target: पुणे जिल्ह्यातील कृषी उद्योगाचे १२ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट

APMC Contribution Waiver: दुष्काळी बाजार समित्यांचे अंशदान माफ करा : सोमवंशी

US Import Ban: कॅनडाच्या उत्पादनांवर अमेरिकेची बंदी

Farmer Diwali Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार : बावनकुळे

Maharashtra Sugar Industry: एक नोव्हेंबरनंतरच साखर कारखाने सुरू करा: इंडियन इरिगेशन फेडरेशनची मागणी

SCROLL FOR NEXT