Akola News: राज्यात कार्यरत असलेल्या कृषी विभाग संलग्न आत्मा योजनेतील करार तत्त्वावरील कर्मचारी मागील अनेक वर्षे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार वेतन मिळावे, यासाठी संघर्ष करीत होते. अखेरीस त्यांच्या मागणीला न्याय मिळाला असून आता राज्यातील या विभागाच्या कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळणार आहे.
राज्यात आत्मा योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरावर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक व संगणक आज्ञावली रूपरेषक कार्यरत आहेत. हे कर्मचारी राज्याच्या कृषिविस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणासाठी साह्य (आत्मा) अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना २०१४ अन्वये कार्यरत आहेत.
यापैकी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक (ATM) व संगणक आज्ञावली रूपरेषक (CP) यांना कामावर रुजू झाल्यापासून एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रति वर्षी १० टक्के मानधनवाढ देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेवर नमूद केल्यानुसार २०१३-१४ किंवा त्यापूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत वाढीव मानधन दिले जाणार आहे.
आता तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापकाला (BTM) ५५,००० रुपये, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकाला (ATM) ४१,२५० रुपये तर संगणक आज्ञावली रुपरेषक (CP) यांना ३३,२५० रुपये वेतन मिळेल. याबाबत कृषी आयुक्तांनी आत्मा जिल्हा प्रकल्प संचालकांना नुकतेच एक पत्र पाठविले आहे.
आत्मा कर्मचाऱ्यांनी दिला लढा
वेतनवाढीच्या मुद्द्यावर ‘आत्मा’च्या कर्मचारी संघटना, कर्मचाऱ्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. आमदारांनी हा विषय अधिवेशनातही मांडला. अखेरीस या लढ्याला न्याय मिळाल्याची भावना आत्मा कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, विस्ताराचे काम या कर्मचाऱ्यांमार्फत थेट बांधापर्यंत केले जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.