Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील कपाशीची अति पावसाने चांगलीच वाताहत केली आहे. पुराच्या कचाट्यात सापडलेली कपाशी वगळता सतत व अति पावसाने आकस्मिक मर, वाढ न होणे याबरोबरच जवळपास चार महिन्यांचा पिकाचा कालावधी आटोपला असताना नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कपाशीला अपेक्षित बोंडच लागली नाहीत. शिवाय जी आहेत ती सुद्धा गळून पडत असल्याची स्थिती आहे. .छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड हे तीन जिल्हे कपाशी उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. परंतु यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशी ऐवजी मका पिकाला पसंती दिल्याने या जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार या तीनही जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ३४ हजार ७४८ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८ लाख ८ हजार ६१८ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली..Cotton Crop Management: कपाशीच्या पातेगळच्या व्यवस्थापनासाठी उपाय.यंदा मे मध्ये पाऊस झाल्याने जूनमध्येच कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली. परंतु सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला संकटात ढकलण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, कालावधी व घेतलेली सोय बघता आजच्या घडीला कपाशीला किमान ५० ते ६० बोंड पक्व अवस्थेत असायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात भागनिहाय २० ते ३० बोंडांपेक्षा जास्त बोंड कपाशीला लागलीच नाही..जी बोंड लागली त्यापैकी खालच्या भागातील बोंड शेतात साचलेल्या पाण्यामुळे सडून गेली. जी पाच दहा बोंड आहेत त्यांचीही अवस्था बिकट आहे. त्यामुळे आतापर्यंत कपाशीवर केलेला खर्च पूर्णतः मातीत गेला आहे. पक्व असलेली व सडलेली बोंड फुटून त्याला कोंब फुटली आहेत. जास्त कालावधीचे पीक असले तरी आता पाऊस थांबल्यास पूर व अति पावसातून वाचलेल्या कपाशीतून काही उत्पादन घेता येईल..Crop Damage: पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांचा संताप; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांसह आमदारांना शेतकऱ्यांनी घेरलं.परंतु आजवर झालेला खर्च लक्षात घेता कापाशित ५० ते ६० टक्के शेत व भागनिहाय उत्पादनात घट निश्चित आहे. पूरस्थितीमुळे दिसणारे नुकसान लक्षात येत असले तरी निसर्गाच्या हल्ल्यातून कपाशीचे झालेले मात्र न दिसणारे नुकसान काही दिवसात पुढे येईल असंही शेतकरी म्हणाले..२४ एकर कपाशी लागवड केली. आता जिथे ६० ते ७० बोंड असायला हवी होती तिथं फक्त १५ ते २० बोंडं आहेत. जी आहेत ती सुद्धा बुरशीमुळे गळून पडत आहेत. ५० ते ६० टक्के बोंडं पाते आधीच गळून पडली.ईश्वर सपकाळ, कापूस उत्पादक, तिडका, ता. सोयगाव.वेळेवर लागवड झाली असली तरी कपाशीला अपेक्षित बोंडं लागलीच नाहीत. फक्त दिसायला हिरवी दिसत असलेली कपाशी पंधरा-वीस बोंडांचा अपवाद वगळता बोंडं आणि पात्याविनाच आहे. होती ती गळून पडली.सोमनाथ नागवे, कपाशी उत्पादक, खामखेडा, ता. भोकरदन, जि. जालना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.