Vidhansabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election 2024 : विधानसभेचे सोलापूर जिल्ह्यातील ३७२३ केंद्रांवर मतदान

Solapur Vidhansabha Election 2024 : जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण; निवडणुकीसाठी २२ हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक.

Team Agrowon

Solapur News: विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवर आली असून पुढील आठवड्यात १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून जिल्ह्यातील तीन हजार ७२३ मतदान केंद्रांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

‘ईव्हीएम’ची प्रथमस्तरीय तांत्रिक पडताळणी पूर्ण झाली असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्या मशिन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाठविल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांकडील २२ हजार कर्मचारी नेमले जाणार आहेत. त्यांची यादी निवडणूक शाखेने तयार केली असून निवडणूक जाहीर झाल्यावर त्या सर्वांना इलेक्शन ड्यूटीची पत्रे पाठविली जाणार आहेत.

सध्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा टप्पा पार पडला असून निवडणूक जाहीर झाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल. निवडणुकीसाठी यावेळी सरासरी १५०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र असणार आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘ईव्हीएम’चे व्हॅन गावागावात फिरले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीपूर्वी १० दिवस अगोदरही मतदारांना नाव नोंदणी करता येते. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही, त्यांना नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

(ॲग्रो विशेष)

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून जिल्ह्यात ३२ हजारांहून अधिक मतदार वाढले आहेत. त्यांनाही या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. विधानसभेसाठी खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज भरल्यापासून ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करता येतो.

निवडणूक आयोगाने विधानसभा उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. त्याप्रमाणेच संबंधित उमेदवारास खर्च करणे बंधनकारक आहे. त्याहून अधिक खर्च झाल्यास त्याचा हिशेब त्यांना द्यावा लागतो.

इलेक्शन ड्यूटी रद्द होणार नाही विधानसभा निवडणुकीसाठी एका मतदान केंद्रांवर किमान पाच कर्मचारी लागतात. त्यानुसार जिल्ह्यातील तीन हजार ७२३ मतदान केंद्रांवर १९ हजार कर्मचारी लागणार आहेत. काही केंद्रांवर वाढीव मनुष्यबळही लागते.

तरीदेखील अनेकजण इलेक्शन ड्यूटी नको म्हणून विविध कारणे पुढे करून अधिकाऱ्यांकडे अर्ज करतात. मात्र, खरोखर अत्यावश्यक कारण असल्याशिवाय कोणाचीही ड्यूटी रद्द होणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अर्जासोबत दिलेल्या कारणांची शहानिशा देखील होईल, असेही अधिकारी म्हणाले आहेत.

मतदानाची तयारी

एकूण मतदान केंद्रे ३,७२३

एकूण कर्मचारी २२,०००

मतदानासाठी ईव्हीएम ४,९००

एकूण मतदार ३८ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT