Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2024 : माऊलींच्या पादुकांचे शाही स्नान संपन्न; तुकोबांची पालखी बारामतीतून पूढे मार्गस्थ

pandharpur wari 2024 : यंदा अत्यंत प्रसन्न वातावरणात आषाढी वारीला सुरूवात झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी देहू येथून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचे पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : यंदा आषाढी वारीला अत्यंत प्रसन्न वातावरणात सुरूवात झाली आहे. देहूतून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना झाली आहे. शनिवारी (ता.०६) ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी सातारकरांनी पालखींचे जोरदार स्वागत केले. एकीकडे माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान पार पडले. तर दुसरीकडे श्री संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीतून (ता.७) पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी पालखीत सहभाग घेतला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

अत्यंत प्रसन्न वातावरणात सुरू झालेल्या वारीत राज्यातील लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. यावेळी परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने साताऱ्यात शनिवारी प्रवेश केला. तसेच माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत स्नान पार पडले. यावेळी वैष्णवांचा मेळा भरला होता. नीरा नदीतील स्नानानंतर माऊलींच्या पालखीचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारही दाखल

यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी रविवारी सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. अजित पवार आणि सुनेत्रा पवार मोतीबाग येथे पायी सहभागी झाले असून पालखी काटेवाडीच्या दिशेने निघाली आहे.

सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी घेतलं जगद्गुरुंचे दर्शन

यंदाचा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणाने पुढे सरकत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी बारामती नगरीमधून काटेवाडीच्या दिशेने निघाली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जगद्गुरुंचे दर्शन घेतले. यावेळी सुळे यांनी, गेल्या १८ वर्षांपासून आपण पालखी सोहळ्यात सहभागी होत आहोत. यंदा चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊदे असे साकडे घातल्याचे सुळे म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही होणार सहभागी

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आषाढी पालखी सोहळ्यामध्ये पायी चालणार आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी पंढरपुरात दिली. तर शिंदे वाखरी ते पंढरपूर पाच किलोमीटर अंतर वारीसोबत चालतील अशीही माहिती चिवटे यांनी दिली. याआधी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आषाढी पालखी सोहळ्यामध्ये पायी चालले होते. त्यानंतर आता शिंदे चालणार आहेत. यासोबतच शिंदे यांच्याकडून आषाढी यात्रेच्या कालावधीत चार दिवस वारकऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात येणार असल्याचीही माहिती चिवटे यांनी दिली आहे.

राहुल गांधी यांना वारीत सहभागी होण्याचे निमंत्रण

दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. राज्यातील जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी राहुल गांधी यांना वारीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. तसेच राहुल गांधी यांना वारीचे महत्व समजावून सांगितले होते. त्यानंतर आता राहुल गांधी येत्या १३ किंवा १४ तारखेला वारीत सहभागी होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT