Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : पाण्याची आवक वाढल्याने उजनीची वाटचाल ५० टक्केकडे

Team Agrowon

Solapur News : पुण्याकडील धरणांतून उजनीकडे येणारा पाण्याचा विसर्ग दुप्पट करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २) तब्बल ३९ हजार ९८२ क्युसेकपर्यंत पाणी उजनीत सोडण्यात येत होते. त्यामुळे धरणातील पाणी पातळी ४१.५८ टक्केवर पोचली.

पाण्याचा हा विसर्ग असाच कायम राहिला, तर मंगळवारी (ता. ३) धरणातील पाणीपातळी ५० टक्केपर्यंत पोचणार आहे. झपाट्याने वाढत असलेल्या या पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्याला विशेषतः शेतीक्षेत्रासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

उजनीच्या वरच्या बाजूला असलेल्या धरणांकडून रविवारपर्यंत २२ हजार क्युसेकने पाणी येत होते. पण सोमवारी सकाळपासून त्यात जवळपास दुप्पटीने वाढ करण्यात आली. पुण्यासह सोलापूर जिल्ह्यात विशेषत: धरणाच्या कार्यक्षेत्रात मागील सहा-सात दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याने उजनीत येणारा विसर्ग वाढला आहे.

आता उजनी धरणात घोड, कासारसाई, आंध्रा, चास-कमान, भामाआसखेड, मुळशी, पवना या धरणांतून जवळपास २२ हजार क्युसेक तर पावसामुळे १६ हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याच्या या अखंड प्रवाहामुळे अवघ्या सातच दिवसांत धरणात १० टीएमसी पाणी आले आहे. पाण्याचा विसर्ग आणखी १५ दिवस असाच राहिल्यास धरण ८० टक्क्यांपर्यंत जाईल, असा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

उपयुक्त साठा २२.२८ टीएमसी

पाण्याच्या या वाढत्या विसर्गामुळे उजनीतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. सोमवारी (ता. २) सकाळी धरणामध्ये एकूण पाणी पातळी ४९३.८३० मीटरपर्यंत राहिली. तर एकूण साठा ८५.९४ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा २२.२८ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी ४१.५८ टक्क्यांवर पोचली.

शेतीला दिलासा

उजनी धरणाच्या पाण्यावर सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोल्यासह शेजारील पुणे आणि नगर जिल्ह्यांतील जवळपास सव्वाशेहून अधिक पाणी योजना अवलंबून आहेत. परंतु यंदा उशिरापर्यंत पावसाने दिलेल्या हुलकावणीने पाण्याची चिंता वाढली होती.

त्यामुळेच उजनी धरणातील पाणी सध्या फक्त पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले होते. पण आता धरणाची पाणीपातळी ५० टक्क्यांच्या घरात पोचणार असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही दिलासा मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT