Agrowon Podcast Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Podcast : तुरीचा पुरवठा कमी असल्याने दरातील तेजी कायम

Market Bulletin : केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही.

Anil Jadhao 

1. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन दरातील सुधारणा आजही कायम होती. सोयाबीनचे वायदे १३.१३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचा भाव ४१७ डाॅलरवर पोचला होता. देशातील बाजारातही सोयाबीन भावात काहिशी सुधारणा झाली. सरासरी भावपातळी मात्र ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळत आहे. सोयाबीनला आणखी काहिसा आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

   
2. देशातील बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा होत आहे. कापसाचे वायदे ६०० रुपयाने वाढले होते. आज दुपारपर्यंत कापूस वायदे ५८ हजार ९८० रुपयांवर पोचले होते. यंदा देशातील कापूस पिकाचे दुष्काळी स्थिती, पाण्याचा मोठा ताण आणि कीड-रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. याचा आधार कापूस दराला मिळू शकतो, असेही जाणकारांनी सांगितले.

3. बाजारात सध्या ज्वारीला चांगला उठाव आहे. पण बाजारातील ज्वारीची आवक घटलेली आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत दिसतात. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. देशात यंदा कमी पावसामुळे ज्वारी पिकालाही फटका बसत आहे. परिणामी पुढील काळातही ज्वारीचे भाव तेजीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे, असे व्यापारी सांगत आहेत. 

4. राज्यातील बाजारात सध्या काकडीचे भाव स्थिर आहेत. काकडीची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून वाढलेली दिसते. तर काकडीचा उठाव मात्र स्थिर आहे. त्यामुळे काकडीच्या भागात मागील काही दिवसांमध्ये नरमाई आली होती. सध्या काकडीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळतो आहे. काकडीचा भाव पुढील काही दिवस दबावातच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

5. केंद्र सरकारने तुरीचे भाव कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सर्व प्रयत्न सुरु केले आहेत. पण तरीही तुरीचे भाव कमी झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे तुरीचा कमी झालेला पुरवठा. मागील हंगामातील तूर हाती आली तेव्हा बाजारभाव हमीभावाच्याही खाली होती. पण जसजस पावसाचं चित्र स्पष्ट होत गेलं आणि लागवड कमी होत गेली. तसेच उत्पादनाविषयीची चिंता वाढत गेली, तसे तुरीचे भाव सुधारत गेले. जून महिन्यापासून तुरीच्या दरात वाढ झाली. ऑगस्ट महिन्यापासून तेजी वाढली. सरकारने तुरीची आयात खुली केली. स्टाॅक लिमिट लावले. आफ्रिकेतील देशांना जास्तीत जास्त तूर द्यावी, यासाठी प्रोत्साहन दिले. बंदरांवरील माल लवकर बाजारात यावा यासाठी धोरणही राबवले.

आफ्रिकेतील तूर आयात होत आहे. पण आयातीचे प्रमाण कमी आहे. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी दिसतो. त्यामुळे भाव कमी होताना दिसत नाहीत. तुरीचे भाव ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान कायम आहेत. तूर डाळीचे भाव बाजारात सरासरी १५० रुपयांच्या दरम्यान आहेत. भाव वाढले तरी तूर डाळीचा उठाव कायम आहे. याचा आधार दराला मिळत आहे. यंदाही देशातील तूर लागवड कमी आहे. कमी पाऊस आणि उष्णतेचा तूर पिकाला फटका बसत आहे. यामुळे पुढील काळातही तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्याशी संध्याकाळी ७ वाजता बैठक; बैठकीला कोण-कोण हजर राहणार?

Import Duty: पिवळा वाटाणा आयातीवर ३० टक्के शुल्क; कडधान्याचे भाव कमी झाल्याने सरकारचा निर्णय

Bacchu Kadu: ...तर आम्ही संपूर्ण रेल्वे सेवा ठप्प करु, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा, आंदोलन सुरुच

Bachhu Kadu Protest : बच्चू कडू यांच्या आंदोलनात दोन जणांना अटक; किसान सभा आणि माकपकडून सरकारचा निषेध

Sugarcane Management: थंडीचा उसावर होणारा परिणाम अन् उपाययोजना

SCROLL FOR NEXT