Chana Market
Chana MarketAgrowon

Chana Market : तुरीऐवजी हरभरा डाळीचा वापर वाढेल का? सरकारचे धोरण काय?

Chana Rate : देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहे. नाफेडने २३ लाख २१ हजार टनांची खरेदी केली. यापैकी मध्य प्रेदश आणि महाराष्ट्रातच १६ लाख टनांची खरेदी झाली.
Published on

Chana Bajarbhav : देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहे. नाफेडने २३ लाख २१ हजार टनांची खरेदी केली. यापैकी मध्य प्रेदश आणि महाराष्ट्रातच १६ लाख टनांची खरेदी झाली. बाजारातील हरभरा आवक सध्या कमी झाली.

पण सरकारच्या दबावामुळे हरभरा दर वाढताना दिसत नाही. तूर आणि उडदाचे भाव तेजीत असल्याने हरभऱ्याचा वापर वाढविण्याचा सरकारचा विचार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशात यंदा १३५ लाख टन हरभरा उत्पादन झाल्याचे केंद्र सरकारने सांगितले. यापैकी नाफेडने आतापर्यंत २३ लाख २१ हजार टनांची खरेदी केली. मागील हंगामातही केंद्राने २६ लाख टन हरभरा खरेदी केला होता. गेल्यावर्षीची खेरदी विक्रमी होती. त्यानंतर यंदाचा आकडा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आहे.

यंदा मध्य प्रदेशात सर्वाधिक ७ लाख ९७ हजार टन हरभरा नाफेडने खरेदी केला. त्यानंतर महाराष्ट्रात ७ लाख ७३ हजार टन आणि गुजरातमध्ये ३ लाख २८ हजार टनांवर खरेदी झाली. उर्वरित खरेदी तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात झाली.

Chana Market
Chana Market : हिंगोली, परभणीत १५ हजारांवर शेतकऱ्यांकडून हरभरा विक्री

केंद्र सरकारने यंदा एकूण उत्पादनापैकी १७ टक्के हरभरा खरेदी केला. पण तरीही खुल्या बाजारात हरभरा भाव दबावातच आहेत. हरभऱ्याला आताही ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. हरभरा भावाला नाफेडच्या खरेदीचा आधार मिळाला नाही.

नाफेडची खेरदी वाढल्यानंतर हरभरा भाव वाढणे अपेक्षित होते. पण उलट नाफेडच्या खरेदीचा बाजारावर दबाव आला. कारण नाफेड स्टाॅकमधील हरभरा पुढील काही काळात बाजारात आणायची शक्यता आहे. हा हरभरा सध्याच्या बाजारभावावरच बाजारात येऊ शकतो, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे बाजाराला आधार मिळाला नाही.

हरभऱ्याचा वापर वाढेल का?

दुसरीकडे तूर आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. सरकारने देशातील उत्पादन आणि स्टाॅकची माहिती घेण्यासाठी समिती स्थापन केली. स्टाॅक लिमिटही लावले. पण तरीही भाव कमी झाले नाही. त्यामुळे सरकार हरभरा डाळीचा वापर वाढविण्याच्या तयारीत आहे. कारण सध्या नाफेडकडे जवळपास ३८ लाख टन हरभरा स्टाॅक आहे.

तसेच उत्पादनही चांगले आहे. हरभरा भाव कमी असल्यास तूर आणि उडदाऐवजी ग्राहक हरभऱ्याचा वापर वाढवू शकतात. जास्तीत जास्त मागणी हरभऱ्याकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकार हरभरा बाजार दबावातच ठेवण्याच प्रयत्न करत आहे, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com