ऐश्वर्य पाटेकर
लेखक-कवी म्हणून मी स्वत:शी केलेली ही प्रतिज्ञा आहे. ती सगळ्यांची व्हावी, ही अपेक्षा मनापासूनची आहे; मात्र हट्ट आणि अट्टहास बिलकूल नाही. शब्दांवर जबर निष्ठा ठेवली म्हणून माझ्या पदरात काही मान-सन्मानाचं दान पडलं आहे. त्या दानासाठी मी निश्चितच लिहीत नाही. माणूस म्हणून जगताना जसं आपल्या संचितात आहे ते आपल्याला मिळतं; मग ते दु:ख असेल, सुख असेल, प्रतिष्ठा असेल. पण कलावंत म्हणून हे संचित सहजी प्राप्त होत नाही.
माझ्यातील सर्जकाचं संचित शोधायचं, तर माझ्या मूळमातीकडे जावं लागेल. मी ज्या गावात जन्माला आलो ते माझं पाटेगाव आणि नदी ओलांडली की लागणारं कोलटेक हे गाव, आणखी गावकुसाच्या जरा पुढे आपलं बस्तान मांडून असलेलं दहिवद हे गाव. या तीनही गावांचं पोस्ट आणि ग्रामपंचायत एकच- तीही माझ्या गावात; म्हणून या गावांना मी माझे गाव असंही म्हणू शकतो. आणखी गावाच्या खालच्या बाजूला असलेलं रेडगाव
अशी लेखक-कवी म्हणून मी स्वत:शी केलेली प्रतिज्ञा आहे. ती सगळ्यांची व्हावी, ही अपेक्षा मनापासूनची आहे; मात्र हट्ट आणि अट्टहास बिलकूल नाही. शब्दांवर जबर निष्ठा ठेवली म्हणून माझ्या पदरात काही मान-सन्मानाचं दान पडलं आहे. त्या दानासाठी मी निश्चितच लिहीत नाही. माणूस म्हणून जगताना जसं आपल्या संचितात आहे ते आपल्याला मिळतं; मग ते दु:ख असेल, सुख असेल, प्रतिष्ठा असेल. पण कलावंत म्हणून हे संचित सहजी प्राप्त होत नाही.
माझ्यातील सर्जकाचं संचित शोधायचं, तर माझ्या मूळमातीकडे जावं लागेल. मी ज्या गावात जन्माला आलो ते माझं पाटेगाव आणि नदी ओलांडली की लागणारं कोलटेक हे गाव, आणखी गावकुसाच्या जरा पुढे आपलं बस्तान मांडून असलेलं दहिवद हे गाव. या तीनही गावांचं पोस्ट आणि ग्रामपंचायत एकच- तीही माझ्या गावात; म्हणून या गावांना मी माझे गाव असंही म्हणू शकतो.
आणखी गावाच्या खालच्या बाजूला असलेलं रेडगाव आणि जिथे आम्ही सातवीनंतरच्या शिक्षणासाठी जायचो ते काजीसांगवी गाव. या गावांनी एकत्रित सत्त्व माझ्या लिखाणास पुरवलं आहे. बालपणात लेखक म्हणून जडणघडण करण्यात या गावांचा खूप मोठा वाटा आहे. ही गावं वजा केली, तर माझ्या साहित्यात काहीच उरणार नाही. या पाचही गावांना एकत्रित केलं तर माझं एक मोठ गाव बनतं. हेच गाव कायमचं माझ्यात वसलं आहे.
मी जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी माझ्यात हेच गाव घेऊन मी गेलेलो असेल. हीच माझ्या निर्मितीची भूमी. इथेच माझ्या साहित्याची बीजे दाटीवाटीने उभी आहेत. गाव, गावातील माणसं, तिथला निसर्ग, त्यांच्या भावभावना यांनी खरं तर माझ्या लिखाणाचा प्रदेश व्यापला आहे. माझ्या लिखाणाला सतत सत्त्व पुरवलं आहे. त्याच्या जोरावरच मी लेखक म्हणून उभा राहिलो. लौकिक आयुष्यातला माझा सातबारा कोरा असला तरी साहित्याच्या सातबाराने खूप मोठी दौलत मला देऊन ठेवली आहे. खरंतर ती मला न पेलवणारी आहे.
मला साहित्याचा हा धागादोरा या इथल्याच प्रदेशात सापडला. तो कसा? तर निर्मितीच्या शोधात हरघडी असावं लागतं. डोळसदृष्टी घेऊन आजूबाजूला धुंडाळावं लागतं. ती कशातही गवसू शकते. रानावनातल्या ढेकळा-धसकटात ती कण्हताना सापडते. कोरड्या झालेल्या नदीबारवात, कोरड पडलेल्या पाखरांच्या घशात, पाण्याविना दम टाकताना सापडते. भाकरीमागे लागलेल्या जिवांत धाप टाकताना सापडते. गरीब-जित्राबाच्या अवस्थेत सापडते. मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झालेल्या गावाजवळ ती तुमची वाट पाहत उभी असते.
माणसांच्या संपलेल्या संवेदनशीलतेत सापडते. मिटलेल्या संवादात सापडते. गाईच्या डोळ्यांतल्या कारुण्यात ओथंबून आलेली सापडते. कधी आईच्या डोळ्यांत दूर गेलेल्या लेकालेकींच्या आठवणींनी पाणावताना दिसते. उनाड पोरांनी दगड मारून पांगळं केलेल्या कुत्र्याच्या दुखऱ्या पायात ती असतेच असते; मात्र त्याने तोंडात धरलेल्या लचक्यातही ती असते. सामान्य लोकांच्या वर्तमान दु:खात, भिकाऱ्याच्या झोळीत दीनवाणी पडलेल्या भाकरीत. परिस्थितीने पाठीत घातलेल्या दांडक्यातही असते.. नुसतंच पाणी पिऊन झोपलेल्या माणसाच्या रिकाम्या पोटात भुकेली झालेली ती सापडू शकते.
तसेच कृषिवलाच्या दैनंदिन अवस्थेत, त्याच्यावर आत्महत्या लादणाऱ्या व्यवस्थेत तर ती अतिशय ठळक झालेली सापडते. नव्या कृषी संस्कृतीने बदल घडविण्याच्या नावाखाली ग्रामसंवेदनाचा गळा घोटला आहे. ढेकळा-धसकटात अस्वस्थ श्वास अडकून पडला आहे. व्यवस्थेच्या विस्तवावर ग्रामीण माणसाचं जगणं, त्याची स्वप्ने जळून करपून गेली आहे. सगळ्या बाजूनी माणसांची भयाण कोंडी झाली आहे. त्याचं सगळंच हिरावून घेतल्याच्या जाणिवेनं तो मरणाला कवटाळतो आहे. त्याच्या आत्महत्येचं रामायण अन् त्याच्या भाकरीचं महाभारत केलं जातंय. तिथं मला कविता, कथा, नाटक सापडणार नाही असे होणार नाही.
(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.