Sitafal Agrowon
ॲग्रो विशेष

Golden Sitafal : गोल्डन सीताफळाकडे ग्राहकांची पाठ

Washi APMC : सध्या सीताफळांचा हंगाम सुरू असून वाशीतील एपीएमसी फळ बाजारात आवक वाढलेली आहे.

Team Agrowon

Washi News : सध्या सीताफळांचा हंगाम सुरू असून वाशीतील एपीएमसी फळ बाजारात आवक वाढलेली आहे. सीताफळाला चांगला भाव मिळत असला तरी बदलत्‍या वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने बहुतांश माल फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ग्राहकांनीही पाठ फिरवल्‍याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.

सप्टेंबर ते नोव्हेंबर हा सीताफळांचा हंगाम मानला जातो. एपीएमसीत गावरान आणि गोल्डन अशी दोन्ही प्रकारची सीताफळे विक्रीस उपलब्ध असून दररोज बाजारात २,५०० ते ३,००० कॅरेट आवक होत आहे. शुक्रवारी (ता. २५) एपीएमसीत १,५०५ क्विंटल सीताफळांची आवक झाली होती.

सीताफळाचे वैशिष्ट्य

गोल्डन सीताफळ हे गावरान सीताफळापेक्षा आकाराने मोठे, रंगाने काहीसे पिवळसर असून चवीला मधुर असते. तसेच यात बियांचे प्रमाण कमी असून इतर सीताफळांपेक्षा गर ५० टक्के जास्त असतो. हे फळ अधिक काळ टिकते.

गोल्डन सीताफळांत अळ्या सापडत असल्याने ग्राहक माल खरेदी करण्यास इच्छुक नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. सध्या गावरान सीताफळे बाजारात उपलब्ध असल्याने त्याला काहीसा चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा किमान खर्च निघत आहे.
- प्रवीण हांडे, व्यापारी, एपीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT