Sitafal Dalimb Estate : परळीजवळ सीताफळ तर मालेगाव जवळ स्थापन होणार डाळिंब इस्टेट; दोन्ही प्रस्तावांसाठी 98 कोटींची तरतूद: कृषिमंत्री मुंडे 

Maharashtra Cabinet Meeting : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर डाळिंब इस्टेट स्थापन करण्यास सोमवारी (ता.३०)झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
Cabinet Meeting
Cabinet MeetingAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : बीड जिल्ह्यातील मौजे वडखेल (ता. परळी) येथे 29.50 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेटला, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर डाळिंब इस्टेट स्थापन करण्यास सोमवारी (ता.३०)झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी 98 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Cabinet Meeting
Salary of Kotwal : कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत ३८ लोककल्याणकारी निर्णय

बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगर रांगेत मोठ्या प्रमाणात सीताफळाचे उत्पादन घेतले जाते. या परिसरातील वातावरण सीताफळ उत्पादनासाठी पोषक आहे. या परिसरात उत्पादित होणाऱ्या सीताफळावर याच ठिकाणी संशोधन व प्रक्रिया झाल्यास सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार असल्याने या ठिकाणी 55 कोटी खर्चाची सिताफळ ईस्टेट प्रस्तावित करण्यात आली होती. 

Cabinet Meeting
Agricultural Mechanization Scheme : कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी वितरित

नाशिक जिल्ह्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब फळबाग लागवडीखाली आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा मालेगाव नांदगाव देवळा परिसरातील वातावरण डाळिंब पिकास पोषक आहे. डाळिंब इस्टेट स्थापना करून डाळिंब ज्यूस उत्पादित करणे तसेच डाळिंबाचे दाणे वेगळे करून फ्रोजन करून निर्यातीस चालना देणे डाळिंब फळ प्रक्रिया साठवण पॅकेजिंग मार्केटिंग  यासाठी प्रशिक्षण व विस्तार केंद्रास मान्यता देणे या उद्देशाने डाळिंब इस्टेट स्थापना येणार आहे. त्यासाठी 53 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे

या इस्टेट मुळे सिताफळ पिकाची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. तसेच साठवणूक व प्रक्रिया सुविधांचा विस्तार केला जाईल. तसेच निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण कलमे विकसित करण्यासाठी करण्यात येईल. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल. तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढेल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार व यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com