Mint Update Agrowon
ॲग्रो विशेष

Mint Health Benefits : सुगंधी, औषधी पुदिना...

Mint Benefits : पुदिना हे पीक मुळचे युरोप, पश्‍चिम व मध्य आशिया येथील असून आफ्रिका, ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेतील समशितोष्ण प्रदेशांत आढळते.ही सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे.

Team Agrowon

Medicinal Plants : पुदिना हे पीक मुळचे युरोप, पश्‍चिम व मध्य आशिया येथील असून आफ्रिका, ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेतील समशितोष्ण प्रदेशांत आढळते.ही सुगंधी आणि औषधी वनस्पती आहे.

औषधी गुणधर्म

१) पानांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. उत्तेजक, वायुनाशी व आकडीरोधक असून पोटदुखी, अर्धशिशी, सांधेदुखी, बद्धकोष्ठ, अतिसार, पोटातील व्रण व सर्दी अशा विकारांवर गुणकारी.

२) पाने स्वयंपाकात स्वादाकरिता वापरतात. पानातून बाष्पनशील मिंट तेल काढून ते सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरतात. पानांपासून मिळवलेल्या तेलात ७० टक्के मेंथॉल असते.

३) चहा, सरबत, जेली, कँडी, सूप आणि आइस्क्रीम यांत पानांचा सुगंध मिसळतात. काही पेयांना सुगंध देण्यासाठी मिंट तेल वापरतात.

४) गांधील माश्या, मुंग्या व झुरळे यांचा नाश करण्यासाठी पुदिन्याचे तेल कीटकनाशकांमध्ये मिसळतात.

पीक व्यवस्थापन

१) चिकणमाती किंवा वालुकामय, निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थांनी युक्त खोल जमीन लागवडीसाठी निवडावी. काळ्या आणि लाल दोन्ही प्रकारच्या जमिनीवरही पुदिना लागवड करता येते.

२) जमिनीची नांगरट करून पुरेसे शेणखत मिसळावे.

३) लागवडीसाठी रनर्स वापरले जातात.

४) पावसाळ्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी लागवड करावी. उत्तर भारतात जपानी पुदिना लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करतात.

५) पेरणीपूर्वी मुनवे १० ते १४ सें.मी. लांबीमध्ये कापून घ्यावेत. मुनव्यांची लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी. ६० सेंमी अंतराच्या ओळीत ४० सेंमी अंतराने मुनव्यांची लागवड करावी.

६) लागवडीच्या वेळी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. प्रतिहेक्टरी १२५ किलो नत्र, ४५ किलो स्फुरद, ६५ किलो पालाशची आवश्यकता आहे. लागवडीच्या वेळी, स्फुरद आणि पालाश संपूर्णपणे आणि नत्र १/५ भाग मातीत मिसळावे. उर्वरित ४/५ नत्र प्रत्येक कापणीनंतर दोनदा द्यावे.

७) साधारणत: पुदिन्याची वर्षातून २ ते ३ वेळा काढणी केली जाते. पहिली कापणी मे - जूनमध्ये करावी. दुसरी कापणी सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये करावी. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये तिसरी कापणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

Karnataka | शेतजमिनीसाठी एकरी ३० ते ४० लाख दर; अप्पर कृष्णा प्रकल्पासाठी भूसंपादन

Nidva Cane Subsidy : ‘क्रांतिअग्रणी’कडून निडवा उसाचे अनुदान शेतकऱ्यांना अदा

SCROLL FOR NEXT