Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Rate : संत्र्याच्या भावावरून वरूड बाजार समितीत वाद

Orange Market : संत्राच्या हर्रासादरम्यान शेतकरी व व्यापारी यांच्यात भावाच्या मुद्द्यावरून वाद झाला.

Team Agrowon

Amaravati News : संत्राच्या हर्रासादरम्यान शेतकरी व व्यापारी यांच्यात भावाच्या मुद्द्यावरून वाद झाला. परिणामी शेतकऱ्यांना आपला माल संबंधित कंपनीमधून परत न्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या कंपनीविरोधात नाराजी व्यक्त करीत आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

मागील दोन वर्षांपासून वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्र्याच्या खरेदीसाठी एक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांचा संत्रा हर्रास पद्धतीने विकली जाते. अशातच शुक्रवारी (ता. ४) बाजार समितीच्या परिसरात संत्र्याचा बाजारभाव २८ रुपये किलोप्रमाणे ठरविण्यात आला.

त्यानंतर काही वेळाने शेतकरी संत्र्याचा हर्रास करण्यासाठी गेले असता त्यांना २८ वरून १६ रुपये भाव मिळाला. एकाच दिवशी दोन भाव कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर कंपनीच्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांसमवेत वाद घातल्यामुळे काही वेळ बाजार समितीमध्ये वातावरण तापले होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल कुणीच न घेतल्यामुळे त्यांनी तेथून माल परत नेल्याने आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेऊन योग्य तो भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी नितीन पेलागडे यांनी केली.

संत्रा पाहून त्याचे भाव ठरविण्यात येतात. चांगला संत्रा असला तर चांगला भाव येतो व थोडा खराब असल्यास त्याचा कमी भाव, असे सूत्र या कंपनीचे आहे. त्यामुळे यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. बाजार समिती शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.
- बबलू पावडे, सभापती, बाजार समिती
या संत्रामंडीमध्ये संत्रा चांगला असला तर त्याचा भाव हा योग्यच मिळतो. संत्र्याचे ग्रेडिंग होऊन त्याचे भाव ठरविण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भाव कमी वाटतो. शेतकऱ्यांचे मी स्वतः आणि सभापती श्री. पावडे यांनी समाधान केले आहे.
- दिनेश मानकर, फ्रूट एक्स कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT