Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : राजू शेट्टी-मुश्रीफ यांच्यात ऊसदरावरून ‘कलगीतुरा’

Raju shetti vs Hasan Musrif : ऊसदराच्या प्रश्नावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : ऊसदराच्या प्रश्नावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. मुश्रीफ यांनी मागील हंगामाचे उर्वरित ४०० रुपये देता येणार नाहीत, असे वक्तव्य केले होते. याचे पडसाद ‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेत मंगळवारी (ता. ७) उमटले.

शेट्टी यांनी मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना कारखानदार शेतकऱ्यांना लुटत असल्याचा आरोप केला होता. माळेगावसारखा कारखाना ‘एफआरपी’पेक्षा जास्त रक्कम देत असताना कोल्हापूर, सांगलीतील कारखाने वाढीव रक्कम का देऊ शकत नाहीत, असा सवाल त्यांनी केला होता. शेट्टी यांच्या भाषणानंतर मुश्रीफ यांनी पत्रक प्रसिद्ध करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

सर्वच साखर कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी त्यांनी कोणत्याही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील. त्यामुळे शेट्टी यांचा साखरविक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज दूर होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे.

मुश्रीफ यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्रातील कोणत्याही साखर कारखान्याने जर प्रतिटनाला ३,५०० रुपये ऊसदर दिला असेल तर तो माजी खासदार शेट्टी यांनी दाखवून द्यावा. आजघडीला कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांतून जवळच असलेल्या कर्नाटक राज्यामधील साखर कारखान्यांकडे प्रतिटनाला २,८०० ते २,९०० दराने ऊस चालला आहे. हीसुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. साखर विक्रीमध्ये सभासदांच्या साखरेचा अंतर्भाव आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत जो वाढलेला दर आहे तो सरासरीने कमी दिसतो. याचीही शहानिशा शेट्टी यांनी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT