Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : कांदा लागवडीपेक्षा विमा घेतलेले क्षेत्र अधिक

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक रुपयांत विमा उतरवताना कांद्याला अनुदान अधिक मिळत असल्यामुळे कांदा लागवड नसतानाही खरिपात कांदा पिकांचा विमा उतरवलेला असल्याचे दिसत आहे. नगर जिल्ह्यात खरीप हंगामात कांद्याची १२ हजार ९८६.४ हेक्टरवर लागवड झालेली असताना प्रत्यक्षात २० हजार ६२६.४२ हेक्टर कांदा पिकाचा विमा उतरवण्यात आलेला आहे.

यामुळे कृषी आयुक्तालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांसह राज्यातील कांदा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात चौकशी सुरू झाली आहे. प्रत्यक्षात झालेली कांदा लागवड आणि पीकविमा क्षेत्र याची शेतात जाऊन तपासणी करण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यात खरिपात कांदा उत्पादन घेतले जाते. शासनाने खरीप, रब्बी हंगामात एक रुपयात विमा योजना सुरू केल्यापासून विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. यंदा खरिपात नगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव आणि पाथर्डी तालुक्यांत १२ हजार ९८६.४ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झालेली असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडे आहे. पीक विमा योजनेत सहभागी होताना २० हजार ६२६.४२ हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा उतरवण्यात आलेला असल्याचे दिसून येत आहे.

पिकाचे नुकसान झाले तर इतर पिकांच्या तुलनेत कांदा पिकाला हेक्टरी ८० हजार रुपये, सोयाबीनला ५७ हजार रुपये व बाजरीला १८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळते. यामुळे इतर कमी भरपाई असलेली पिके पेरलेली असताना कांदा पिकाचे पीकविमा उतरवण्यात बनवेगिरी करण्यात आल्याचा कंपन्यांनी कृषी आयुक्तालयाकडे केला आहे.

याबाबत कृषी आयुक्तालयाकडे तक्रार आल्यानंतर राज्याच्या कृषी विभागाकडून याबाबत जिल्हास्तरावर संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील कांदा लागवड व कंसात विमा उतरवलेले क्षेत्र (हेक्टर)

 संगमनेर २ हजार ३४३ हेक्टर (४ हजार ६२२.१८)

 श्रीरामपूर ३.४० हेक्टर (१००.६)

 राहुरी ११२ हेक्टर (८३२.९२)

 नेवासा २७५ हेक्टर (१ हजार २४४.९३)

 श्रीगोंदा ६ हजार ३०९ हेक्टर (८ हजार ८५५.३३)

 कोपरगाव लागवड क्षेत्राची कृषीकडे माहिती नाही (२२४)

 पाथर्डी ३ हजार ९४४ (४ हजार ७४६.२८)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT