Latur News: लाडक्या बहिणीसाठी शासनाच्यावतीने निधीची तरतूद करून निधी दिला जात आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत कमी पैशावर काम करणाऱ्या महिला परिचारिकांच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही काय तुमच्या सावत्र बहिणी आहोत काय असा प्रश्न महिला परिचरांनी शासनाला केला आहे.
राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने सोमवारी (ता. ३०) विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मागण्याच्या घोषणाही त्यांनी दिल्या. तसेच मंगळवारपासून (ता. एक) काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींना घर बसल्या पगार दिल्या जात आहे.
तर दुसरीकडे जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्रात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवारत अंशकालीन महिला परिचरांची उपासमार होत आहे. त्यामुळे मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे. किमान वेतन देण्यात यावे, अंशकालीन नावात बदल करण्यात यावे, दरवर्षी गणवेश भाऊबीज व अपघात विमा कवच देण्यात यावे,
आयुर्वेदिक डिस्पेन्सरी त्या ठिकाणी साफ सफाई केली जाते त्याचा मोबदला द्यावा, बायोमेट्रीकची सक्ती करण्यात येऊ नये, दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत मानधन करावे आदी मागण्या या महासंघाच्या आहेत. या मागण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात या महिला परिचर यांनी ठिय्या केला.
तसेच मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनासाठी संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्ष संगीता गवळी, कार्याध्यक्ष सुवर्णा कळसे, छाया जांभळदरे आदींनी पुढाकार घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.