Farmer Rights: शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेले ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन मागे घेताना सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात करून सरकारने लबाडी केली आहे..त्यामुळे सरकारला विनाअट सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी सोमवारी (ता. २९) छत्रपती संभाजीनगर येथे ‘एल्गार अन्नदात्यांचा’ आंदोलन करण्यात येणार आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात सरसकट कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली..Farm Loan Waiver: कर्जमुक्ती योजना; पात्र शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर 'अपलोड' करणे सुरु.शुक्रवारी (ता. २६) परभणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, व्यंकटराव कदम, जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे आदी उपस्थित होते..Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक.रोहित पवार म्हणाले, की राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटींमुळे सुमारे ७० टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे कोणतीही अट न ठेवता दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर एक लाख रुपये द्यावेत. एल-निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच पीकविमा योजनेतील बंद करण्यात आलेले ट्रिगर पूर्ववत सुरू करावेत आणि एक रुपयात पीकविमा योजना पुन्हा लागू करावी..शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, यासह विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सहभागी होणार असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.