Jaggery Production Agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Production : कर्नाटकच्या पणन विभागाचा मनमानी कारभार, सीमा भागातील गुळाची अडवणूक

Karnataka Marketing Department : कर्नाटक येथील पणन मंडळाकडून सांगलीकडे येणारा गूळ अडविण्यात येत आहे. दहा गुळाचे ट्रक गुरुवारी अडविण्यात आले.

sandeep Shirguppe

Karnataka Marketing Department Jaggery : कर्नाटक येथील पणन मंडळाकडून सांगलीकडे येणारा गूळ अडविण्यात येत आहे. दहा गुळाचे ट्रक गुरुवारी(ता.२६) अडविण्यात आले. म्हैसाळ येथे जीएसटी विभागाकडून ही गूळ अडवणूक करून शेतकऱ्याकडे जीएसटी भरण्याबाबत तगादा लावण्यात येत आहे. त्याविरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सांगली कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या येथील मार्केट यार्डात जिल्ह्यासह विविध राज्यातून गूळ, हळद, बेदाणा, धान्य आदी शेतमालाची आवक होत असते. तेथील बाजारपेठेत चांगला दर मिळतो. वेळेवर पैसेही शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे बाजारपेठेबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे. अनेक शेतकरी गूळ तयार करण्याअगोदर व्यापाऱ्यांकडून अनामत घेतात.

गूळ तयार झाल्यानंतर तो विक्रीसाठी सांगली बाजार समितीकडे पाठवतात. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक येथील बाजार समितीकडून सांगलीत जाणाऱ्या गुळाची वारंवार अडवणूक केली जात आहे‌. तरीसुद्धा शेतकरी सांगलीत गूळ घेऊन येतात. त्याशिवाय जीएसटी विभागाकडूनही गूळ अडवून चौकशी केली जात आहे. शेतकऱ्याच्या मालाला जीएसटी लागू होत नाही. तरीसुद्धा तगादा लावला जात आहे. त्याचा हळदीच्या आवकेवर परिणाम होत आहे‌.

बाजार समितीच्या सभेत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई यांनी विषय मांडला. बाजार समितीच्या पुढाकाराने व्यापारी, हमाल यांच्याच दोन ते तीन वेळा बैठक झाली. सभापती सुजय शिंदे यांनी तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Rural Development Department : यशवंत पंचायतराज समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी

SCROLL FOR NEXT