ॲग्रो विशेष

Varur-Akhegaon Scheme : वरूर-आखेगाव योजनेला मान्यता देऊन निधी द्या

Devendra Fadnavis : काकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन योजनेची माहिती दिली.

Team Agrowon

Nagar News : तालुक्यातील वरूर-आखेगावसह नऊ गावांच्या (सध्या बंद असलेली ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक मधून) सिंचन योजनेला मान्यता देऊन त्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी ॲड. शिवाजीराव काकडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

काकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन योजनेची माहिती दिली. फडणवीस यांनी या प्रकल्पास मंजुरी देऊन प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती जनशक्ती विकास आघाडीच्या नेत्या व माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी दिली.

काकडे म्हणाल्या, की जायकवाडी जलाशयामध्ये शेवगाव तालुक्याच्या नावाने ३.८ टीएमसी पाणी राखीव असून, या पाण्यातून ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक ०२ मधील १७ गावे ओलिताखाली आणण्यासाठी २.२ टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला यश आले आहे.

या पाण्याची चाचणी देखील झाली आहे. आता उर्वरित १.६ टीएमसी पाणी हे शेवगाव तालुक्यातील सालवडगाव, खरडगाव, वरूर खुर्द, वरूर बुद्रुक, आखेगाव तितर्फा, आखेगाव डोंगर, मुर्शदपूर, थाटे, वाडगाव, हसनापूर या अतिदुष्काळी असलेल्या गावांना मिळावे या मागणीसाठी शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षांपासून कृती समिती पाठपुरावा करत आहे.

या शिष्टमंडळात रंगनाथ ढाकणे, माणिक म्हस्के, लक्ष्मण गवळी, नामदेव ढाकणे, वामन जवरे, आदिनाथ लांडे, नामदेव जायभाये, अजिनाथ विघ्ने आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Crop Care: अवकाळी पाऊस- गारपिटीमध्ये ज्वारी पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?

MSP Online Registration: भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

Navtejashwini Festiva: नवतेजस्विनी महोत्सवात सव्वाआठ लाखांची उलाढाल

Unseasonal Rain: जोरदार पावसासह गारपिटीचा दाणादाण

Jyotiba Chaitra Yatra Kolhapur: 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'! चैत्र यात्रेसाठी भक्तीचा महासागर उसळला, लाखो भाविक दाखल

SCROLL FOR NEXT