Farmer Loss: नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, निफाड, सिन्नर, चांदवड, देवळा आणि येवला या तालुक्यांना पूर्वमोसमी पाऊस आणि जोरदार गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांची दाणादाण उडाली आहे. जिल्ह्यात १५४ गावांमधील ३० हजार शेतकरी बाधित झाले आहेत. यामध्ये उन्हाळ कांदा, डाळिंब, गहू, मका, कांदा बिजोत्पादन व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान आहे.ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे..सध्या रब्बी हंगामातील पिके काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत.मात्र,वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बागलाण मालेगाव,देवळा,निफाड,सिन्नर व चांदवड तालुक्यात मोठी नासाडी झाली आहे.उन्हाळ कांद्याला सर्वाधिक फटका बसला आहे. शेतात काढून ठेवलेला व काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजल्याने तो खराब होऊन प्रतवारी बिघडण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे..Unseasonal Rain: अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात बरसला अवकाळी .गव्हाचे उभे पीक जमीनदोस्त झाले आहेत. याशिवाय पेरू आंबा,चिकू,मका,टरबूज,खरबूज आणि पालेभाज्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. गारांच्या तडाख्याने डाळिंबाची फळगळ झाली असून बागांचे क्रॉपकव्हर फाटले आहे. अंतापूर व परिसरात वादळामुळे आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्याने उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बागलाण आणि मालेगाव तालुक्यांत सलग दोन तास अतिवृष्टी व गारपीट झाली..Unseasonal Rain Impact: रब्बी पिके, फळपिकांना पाऊस, गारपिटीचा फटका.सटाणा, मुंजवाड, अंतापूर, नामपूर, डांगसौंदाणे या महसूल मंडळांत पावसाचा जोर अधिक होता. बागलाण महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बागलाण तालुक्याला पूर्वमोसमी पावसाने झोडपले. बागलाण महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नामपूर, मुंजवाड, टेंभे खालचे, कीकवारी, वीरगाव, डांगसौंदाने महसूल मंडळात पावसाचा जोर राहिला. वादळी वाऱ्यामुळे येथील केळी, शेवगा पिकांच्या लागवडी बाधित झाल्या आहेत. तर मोसम.व करंजाडी खोऱ्यात गारांच्या तडाख्यात खरड छाटणी होऊन फूट असलेल्या द्राक्ष बागा अडचणीत सापडल्या आहेत..सिन्नर,निफाड,नांदगाव,सुरगाणा तालुक्यात अशी नुकसान समोर आले आहे. तुलनेत ते कमी आहे. सिन्नर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अस्मानीने धुमाकूळ घातला असून शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. येवला तालुक्याच्या पूर्व भागात वादळामुळे मोठे नुकसान आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.