Jowar Crop Care: अवकाळी पाऊस- गारपिटीमध्ये ज्वारी पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?

Sorghum in unseasonal Rain: पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पीक ज्वारीचे पीक लोळणे, दाण्यांना कोंब फुटणे आणि बुरशीजन्य संसर्गामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. शेतकरी योग्य साठवण आणि नियोजन करुन ज्वारी पिकाची काळजी घेऊ शकतात.
Best practices for sorghum farming in extreme weather
Best practices for sorghum farming in extreme weatherAgrowon
Published on
Updated on

Crop Protection Sorghum: सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांना झोडपलं आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पीक ज्वारीचे पीक लोळणे, दाण्यांना कोंब फुटणे आणि बुरशीजन्य संसर्गामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. शेतकरी योग्य साठवण आणि नियोजन करुन ज्वारी पिकाची काळजी घेऊ शकतात.

पावसादरम्यान किंवा पावसानंतर लगेच

अवकाळी पावसामुळे शेतात जास्त झालेले पाणी त्वरित काढून टाकावे पाणी साचू नये म्हणून पाण्याचा योग्य निचरा करावा, कारण ज्वारी साचलेल्या पाण्याला संवेदनशील असते.

लोळलेल्या झाडांना आधार द्यावा, पीक लोळल्यास, शक्य असेल तिथे, विशेषतः लहान शेतांमध्ये, झाडे हळुवारपणे उचलून सरळ करावीत.

ओल्या जमिनीत शेतीची कामे टाळा, जमिनीची घट्टता आणि मुळांचे नुकसान टाळण्यासाठी जमीन जास्त ओली असताना शेतात प्रवेश करू नका.

Best practices for sorghum farming in extreme weather
Hailstorm Damage: गारपीट-अवकाळीमध्ये ऊस पिकाची काळजी कशी घ्यावी?

पाऊस थांबल्यानंतर

शक्य तितक्या लवकर कापणी करा, पीक पक्व होण्याच्या जवळ असल्यास, कणसांमध्ये दाण्यांना कोंब फुटणे, बुरशीची वाढ होणे अशा समस्या आढळतात. त्यामुळे वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. कापणी केलेली कणसे व्यवस्थित वाळवा, सूर्यप्रकाशात पातळ थरात पसरा, एकसमान वाळण्यासाठी नियमितपणे पलटा, जमिनीतील ओलावा शोषला जाऊ नये म्हणून ताडपत्रीचा वापर करा.

रोग व्यवस्थापन

पाऊस आणि आर्द्रतेमुळे बुरशीचा धोका वाढतो. याकरीता कार्बेंडाझिम या बुरशीनाशकाची ०.१ टक्का म्हणजे १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात किंवा मॅन्कोझेबची ०.२५ टक्के म्हणजे २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारावे. यामुळे दाण्यांवरील बुरशी आणि कणसांवरील रोगांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. असा सल्ला ज्वारी संशोधन केंद्रातील ज्वारी कीटकशास्त्रज्ञ डॉ. सोनाडकर यांनी दिला.

Best practices for sorghum farming in extreme weather
Onion Care in Rain: गारपीट आणि अवकाळीमध्ये कांदा पिकाचे नियोजन कसे करावे?

वाऱ्यामुळे होणारे नुकसान व्यवस्थापन

हलकी माती लावल्याने अर्धवट लोळलेली रोपे स्थिर होण्यास मदत होते. पुढील पिकांमध्ये अतिरिक्त नत्र खताचा वापर टाळा यामुळे लोळण्याचा धोका कमी होतो.

साठवणुकीमध्येही खबरदारी पाळावी. धान्यातील ओलावा १२ टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा तर हवेशीर आणि कोरड्या जागी साठवावे.

दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाय

अवेळी येणाऱ्या पावसात पीक पक्व होऊ नये म्हणून वेळेवर पेरणी करा. संतुलित खत व्यवस्थापन करावे. अतिरिक्त नत्र खताचा जसे युरिचा वापर टाळावा. तसेच रोपांमध्ये योग्य अंतर ठेवा. असा सल्ला ज्वारी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. ठाकरे यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com