Rabi Crops: केंद्र शासनाने रब्बी हंगाम २०२५–२६ साठी निश्चित केलेल्या हमीभावाने ज्वारी, मका, बाजरी व रागी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी पोर्टलच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण पद्धतीने ऑनलाइन शेतकरी नोंदणी प्रक्रिया १ ते ३० एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा पणन अधिकारी आर.एस.इंगळे यांनी केले आहे..नोंदणी झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया १ मे ते ३० जून या कालावधीत पार पडणार असून जिल्ह्यात २२ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, बाजरी व रागी या पिकांच्या हमीभावाने विक्रीसाठी सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील व आधार संलग्न मोबाईल क्रमांकासह संबंधित खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे खरेदीची तारीख कळविण्यात येणार असून त्या दिवशी खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी खरेदी केंद्राशी संपर्क साधावा, असे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी श्री. इंगळे यांनी कळविले आहे..Chana Procurement Registration: हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू.जिल्ह्यातील खरेदी केंद्रे (कंसात संपर्क क्रमांक)येवला ता.सह.ख.वि.संघ लि.(९४२३१७६३४९)शेतकरी सह.संघ लि.,मालेगाव(८९९९४६९९९०)देवळा ता.सह.ख.वि.संघ लि.(९७६७५७९६१४)लासलगाव विभाग सह.ख.वि.संघ,(९७६३४२१२५७).MahaDBT Portal: सव्वादोन लाख शेतकऱ्यांची निवड; लाभ २४ हजारांनाच.कृषीसाधना म.फळे व भाजी सह.संस्था लि.,विंचूर (७०३८५०५३८६)सिन्नर ता.सह.ख.वि.संघ लि.(९७६७६०२८५२)चांदवड ता. सह. खरेदी विक्री संघ लि.(९०११२०४१३०)सटाणा(द) भाग वि.का. सह.सोसा.मर्या.(९४२०३६७०७५)नामपूर बु. विविध कार्यकारी सोसा.लि.,(९४२१५०१८३६)शनैश्वर नांदगाव ता.सह.ख.वि.संघ लि.(९४२०२३०७७७)चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था लि., रायपूर(९८२३५१९४११).आश्रय मार्केटिंग अँड प्रोसेसिंग को-ऑप सोसा.लि., खडकमाळेगाव(९४२३०९४८२६)सहकार महर्षी गोंविदराव (नाना) सोनवणे वि.कार्य सेवा अंदरसूल(९४२३२२०९३९)अंजनी मेंढपाळ सहकारी संस्था मर्या.,साकुरीझाप,ता. मालेगाव(८२७५५८३५९१)अलियाबाद आदिवासी विविध कार्य सह.संस्था मर्या., अलियाबाद (ता.बागलाण)(९३५६१०१६७६)वीरगाव विविध कार्य सह.(विकास) सेवा संस्था मर्या., वीरगाव (ता.बागलाण)(९१३०३०९७५५)MSP Online Registration.खामलोण विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या., खामलोण (ता.बागलाण)(९८०९३६३३३३)स्व.मोठाभाऊ अहिरे बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्या.,झोडगे(९४०३५८९८८४)कृषिराज शेतकरी उत्पादक सहकारी संस्था,पाटणे फाटा, मालेगाव(८०५५३९३३९७)राष्ट्रीय स्वयंरोजगार व नागरी सेवा सह.संस्था मर्या., मालेगाव(९३७१६९५९६५)समृद्धी बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्या., देवळा(७२६२०८७७५३)धोडंबा वि.का.सेवा सह.सोसा.लि., वडाळीभोई(७३५००४९२१८).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.