Farmer Land Law agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Land Law : वर्ग २ जमीन वर्ग १ होण्यास मान्यता, खंडकरी शेतकऱ्यांना दिलासा

Maharashtra Land : महाराष्ट्रात वर्ग २ची जमीन वर्ग १ करण्यासाठी अत्यंत क्लिष्ट आणि वेळ खाऊ प्रक्रीया असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Government : महाराष्ट्रात वर्ग २ची जमीन वर्ग १ करण्यासाठी अत्यंत क्लिष्ट आणि वेळ खाऊ प्रक्रीया असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यास तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मान्यता देण्यात आली. मागच्या कित्येक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबीत राहिला होता. याला मान्यता मिळाल्याने हजारो खंडकरी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने वाटप करण्यात आल्या होत्या.

ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी वर्ग-१ च्या जमिनी खंडाने दिलेल्या होत्या त्या परत मिळताना त्यांना वर्ग - २ म्हणून मिळाल्याने या जमिनींचा धारणा प्रकार वर्ग १ करून देण्याची अभियानासाठी भरघोस पारितोषिके खंडकरी शेतकऱ्यांची बऱ्याच काळापासूनची मागणी होती. या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग करण्याच्या या सुधारणेमुळे ६ जिल्ह्यांतील १० तालुक्यांमध्ये वाटप करण्याच्या या सुधारणेमुळे ३८ हजार ३६१ एकर क्षेत्राचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-१ असा होणार आहे.

सुमारे २ हजार ६०० खंडकरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. वेगवेगळ्या सार्वजनिक प्रयोजनांसाठी शेती महामंडळाची जमीन मिळण्याबाबत ग्रामपंचायतींकडून मागणी करण्यात येत होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon: मॉन्सूनची आगेकूच

Red Sandalwood Case: ‘लाल चंदन’प्रकरणी शेतकरी कुटुंबाला उच्च न्यायालयाची तंबी; ५० लाख जमा करण्याचे आदेश

Maharashtra Monsoon Rain: कोकणात पावसाचा जोर वाढणार

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

SCROLL FOR NEXT