Solapur News : ‘‘सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला स्वीकारण्यासाठी वारंवार आव्हान दिले जात आहे. जमीन बळजबरीने हस्तांतरित करण्यात येईल, अशी तंबीदेखील दिली जात असताना कुटुंबासोबत जीव देऊ, परंतु अत्यल्प दरात जमीन देणार नाही,’’ असा इशारा आता संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे व ओमप्रकाश पाटील यांनी दिला.
जिल्हा प्रशासनाकडून वारंवार मोबदला स्वीकारण्यासाठी दबाव वाढत असताना नुकतीच सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी आदी तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांची पुढील रणनीतीविषयी बैठक पार पडली. या बैठकीला राजन क्षीरसागर-परभणी, नारायणराव विभूते-वाशीम, विलास गावडे-वाशीम, बाबासाहेब धोंडे-राहुरी, दादासाहेब बंदे-अकलूज व जोशी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी बहुसंख्य बाधित शेतकरी उपस्थित होते.
हा महामार्ग हा सार्वजनिक प्रयोजनाचा रस्ता नसून, व्यावसायिक प्रकल्प आहे. केवळ मोबदल्याचा विषय नाही, तर रस्त्याच्या निर्मितीमुळे अनंत अडचणी येणार आहेत. भूसंपादन करताना फेरमूल्यांकन करून बिगरशेती दराप्रमाणे मावेजा मिळावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी या वेळी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.