Rashtriy krishi vikas yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Rashtriy krishi vikas yojana: राष्ट्रीय कृषि विकास योजनेसाठी १२० कोटी ३३ लाख रुपये निधी वितरणास मान्यता

Budget Allocation : शासन निर्णयानुसार यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९८ कोटी २१ लाख रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १४ कोटी ७१ लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ७ कोटी ३९ लाख रूपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

Dhananjay Sanap

Government Approval : राज्य सरकारने राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या अंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निधी वितरणाला मान्यता दिली आहे. राज्य सरकारने सर्वसाधारण प्रवर्गासह, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील पात्र शेतकऱ्यांसाठी १२० कोटी ३३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शुक्रवारी (ता.२१) शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत २०२४-२५ मध्ये नवीन प्रकल्पासाठी २९३ कोटी २९ लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्याला मंजूरी देण्यात आली होती. त्यापैकी यामध्ये प्रकल्प अहवालानुसार केंद्र सरकारने ७४ किती ७४ लाख रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. त्याच समरूप राज्य सरकारने ४८ कोटी १३ लाख रुपयांच्या निधीला मंजूरी दिली.

शासन निर्णयानुसार यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९८ कोटी २१ लाख रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १४ कोटी ७१ लाख रुपये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ७ कोटी ३९ लाख रूपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

दरम्यान, या योजनेच्या अंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका, सूक्ष्म सिंचन, पीक वैविध्य, कृषी स्टार्टअप निधी, प्रति थेंब अधिक पीक, पिक विविधीकरण, आणि सेंद्रिय शेती यासारख्या योजना राबवल्या जातात. त्यातून विविध घटकांसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT