Stop SIR Process: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करावे, चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुनर्स्थापित करावीत आणि निवडणूक आयोगाची स्वायत्तता व विश्वासार्हता कायम ठेवावी, या मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) वतीने बुधवारी (ता. ३०) राज्यातील २३ जिल्ह्यांत आंदोलन करत प्रशासनाला ठिकठिकाणी निवेदन देण्यात आले, अशी माहिती पक्षाचे राज्य सचिव डाॅ. अजित नवले यांनी दिली..नवले यांनी सांगितले, की राज्यातील एसआरआर प्रक्रियेत आधीच्या ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदारांपैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ मतदारांची गणनापत्रे उपलब्ध न झाल्याने त्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. यामध्ये ७५.५२ लाख मतदार आढळले नाहीत. ७६.८० लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, ३४.८१ लाख मृत आणि १७.६३ लाख दुबार अथवा अन्यत्र नोंद असलेले म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहेत. या आकडेवारीमुळे पात्र मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जाण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने या सर्व प्रकरणांची पारदर्शकपणे फेरतपासणी करून कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार हिरावला जाणार नाही, याची हमी द्यावी..Indian Politics: राजकारण-समाजकारणातील ‘सुपर क्रिटिकल’ टप्पा .मतदार यादी ही लोकशाहीतील मूलभूत संस्था आहे. ती तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शक, विकेंद्रित आणि कायदेशीर अधिकार असलेल्या स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना प्रभावी अधिकार देणारी असली पाहिजे. मतदारांच्या नावांचा समावेश किंवा वगळणे ही प्रक्रिया अपारदर्शक किंवा केवळ केंद्रीकृत तांत्रिक व्यवस्थेवर अवलंबून राहू नये, असे नवले म्हणाले. लोकशाही आणि नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी आंदोलनाची ही मालिका पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला..Indian Politics: राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका.‘माकप’च्या मागण्या...एसआयआर प्रक्रिया तत्काळ थांबवावी.मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलेल्या सर्व पात्र नागरिकांची नावे तातडीने पुनर्स्थापित करावीत..प्रत्येक वगळलेल्या मतदाराला दावे व हरकती नोंदविण्याची, त्यावर निष्पक्ष सुनावणीची प्रभावी संधी द्यावी.निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची विद्यमान पद्धत बदलून पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र निवड समितीमार्फत नियुक्तीची व्यवस्था करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.